Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

एचएआरसी संस्थेच्या वार्षिक सेवा अहवालाचे जलमित्र व बालरोगतज्ज्ञ डॉ. कालानी यांच्या हस्ते प्रकाशन





परभणी ➡️ वंचित, निराधार, अनाथ, एचआयव्ही एड्सग्रस्त तसेच बालके, किशोरवयीन मुली, निराधार महिलांच्या शिक्षण, आरोग्य, पुनर्वसन या विषयावर काम करणारी संस्था 'होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज' ने 1 एप्रिल 2021 पासून ते 31 मार्च 2022 दरम्यान केलेल्या विविध समाजोपयोगी कार्यावर आधारित वार्षिक सेवा अहवाल डिजिटल स्वरूपात तयार केला आहे. या वार्षिक सेवा अहवालाचे प्रकाशन आज दि 31 मार्च रोजी जलमित्र व प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ राजगोपाल कालानी यांनी स्वाध्यायशक्ती अभ्यासिकेत झाले. 


डॉ. पवन चांडक यांनी या प्रसंगी संस्थेच्या कार्याविषयी माहिती देताना म्हणाले "होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज संस्था मागील 13 वर्षा पासून शासनाची कोणतीही मदत न घेता, एचआयव्ही संक्रमित बालके, निराधार विधवा महिला व अनाथांच्या मूलभूत प्रश्न शिक्षण, आरोग्य व पुनर्वसनपर गरजांसाठी नियमितपणे प्रयत्न करते. या पुढे देखील हे कार्य एचएआरसी टीम व दात्यांच्या सहयोगाने सुरू राहील. 



या प्रसंगी डॉ. पवन चांडक यांनी एचएआरसी संस्थेच्या कार्याचा व वार्षिक अहवाल सादर केला. या कार्यक्रमाच्या निमित्त दि. 31 मार्च रोजी एचएआरसी संस्थेच्या सर्व सदस्यांच्या उपस्थिती मध्ये या वार्षिक सेवा अहवालाच्या प्रकाशन संदर्भात तसेच भविष्यातील सामाजिक कार्याच्या संदर्भात बैठक स्वाध्यायशक्ती अभ्यासिकात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत मागील 2021-22 मध्ये केलेल्या विविध सामाजिक उपक्रमाविषयी मंथन व आढावा घेण्यात आला. या प्रसंगी सर्वानुमते भविष्यात 2021-22 मध्ये राबविण्यात येणाऱ्या विविध सामाजिक उपक्रम विषयी नियोजन करण्यात आले. 


एचएआरसी संस्थेने 2021-22 मध्ये आयोजित केलेल्या विविध सामाजिक उपक्रम पुढीलप्रमाणे आहेत. 

1) 330 वंचित, अनाथ, HIV ग्रस्त बालकांचे शैक्षणिक पालकत्व
2) कोविड सामाजिक कार्य: 4 oxygen concentrator मशीन द्वारे घरपोच सेवा,  म्यूकोमायकोसिससाठी प्रतिबंधक होमिओपॅथी औषधी
3) 400 वंचित, HIV, अनाथ मुलांसोबत दिवाळी साजरी
4) मासिक पाळी स्वच्छता व्यवस्थापन
सत्राची संख्या: 17,  समुपदेशन चा लाभ मिळालेले विद्यार्थी: 3040, मोफत सॅनिटरी पॅड मिळालेल्या मुली: 1072 मुली
5) एचआयव्ही/एड्स ग्रस्तांसाठी- पोषण, काळजी आणि पुनर्वसन: 300 एचआयव्ही बालके व मातांसाठी पोषक आहार, मल्टीविटामिन, स्वेटर्स, शैक्षणिक किट, दिवाळी किट आदी
6) 21 PLHIV, निराधार विधवा ताईंना उदरनिर्वाहासाठी साधने : 15 शिलाई मशीन, 2 पिठाची गिरणी, 2 डाळ काढायची मशीन, 3 शेळ्या.
7) एड्स जनजागृती सायकल मोहीम: पुणे पंढरपूर कळंब 450 किमी. वाघा दिल्ली उज्जैन 1320 किमी.



डॉ. राजगोपाल कालानी यांनी या प्रसंगी एचएआरसी संस्थेच्या उपक्रमाचे कौतुक करून मोलाचे मार्गदर्शन केले. या बैठकीत  डॉ. जयश्री कालानी, उल्हास खंबायतकर, राजेश्वर वासलवार, गोपाळ मुरक्या, नेहा मुरक्या, डॉ पवन चांडक, डॉ सौ आशा चांडक, प्रा पद्मा भालेराव, प्रा स्वाती कवडे, संदीप भंडे, श्रीरंग पांडे यांनी आपले विचार मांडले. या वार्षिक सेवा अहवाल तयार करण्यासाठी आकाश गीते, प्रा. स्वाती कवडे, प्रा. विशाका हेलसकर व प्रा. शिवा आयथळचे तांत्रिक साहाय्य लाभले.






Post a Comment

0 Comments