Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

परभणीत आयपीएलमधील क्रिकेट सामन्यांंवर सट्टा लावणारे तीन आरोपी अटक  





परभणी
➡️ 
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 30 मार्च रोजी रात्री 8.30 वाजेच्या सुमारास शहरातील धार रोड परिसरात कारवाई करीत आयपीएलमधील क्रिकेट सामन्यांवर सट्टा लावणार्‍या तिघांना ताब्यात घेतले. त्यांंच्याजवळून 16 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल पथकाने जप्त केला आहे.  नानलपेठ पोलीस ठाण्यात या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे


प्राप्त माहितीनुसार स्थागुशाचे पोलिस उपनिरीक्षक साईनाथ पुयड, सपोउपनि हनुमंत जक्केवाड, पोलिस कर्मचारी बाळासाहेब तुपसुंदरे, हरिश्चंद्र खुपसे, दिलावर खान, शेख अजहर यांचे पथक अवैध धंद्यांची माहिती काढण्यासाठी पोलीस ठाणे हद्दीत 30 मार्च रोजी रात्री 8.30 वाजेच्या दरम्यान गस्तीवर होते. 


या पथकाला धार रोड येथे एका मोबाईल शॉपमध्ये आयपीएलमधील क्रिकेट सामन्यांवर सट्टा चालू असल्याची माहिती मिळाली . या माहितीच्या आधारे पथकाने त्याठिकाणी छापा टाकला. पोलिसांना पाहून आरोपी पळू लागले. या पाठलाग करुन तीन आरोपींना पकडण्यात आले. 



या प्रकरणी आरोपी आकाश परसराम भंडारे, राजू आसाराम गडदे, राकेश सुभाष कुरील यांच्याविरोधात नानलपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




Post a Comment

0 Comments