Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

घरासमोर पार्क केलेली कार चोरांनी पळवली




जिंतूर ➡️ शहरातील शिवाजी नगरमध्ये घरासमोर पार्क केलेली 03 लाख 50 हजार रुपये किमतीची कार अज्ञात चोरट्याने चोरून नेली. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध जिंतूर पोलीस ठाण्यात 30 मार्च रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जालना जिल्ह्यातील मंठा येथील रहिवासी माणिक शेंडगे (वय 63) हे 28 मार्च रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास जिंतूर येथील शिवाजी नगर येथील रहिवासी असलेल्या त्यांच्या मुलाच्या घरी लग्नात सहभागी होण्यासाठी गेले होते. हिंगोली येथे लग्न समारंभ पार पडला. लग्न कार्यक्रम संपल्यानंतर रात्री 08 वाजता मुलाच्या घरी जेवण करून माणिक यांनी घरासमोर कार उभी केली. 



दुसऱ्या दिवशी 29 मार्च रोजी पहाटे 5.30 वाजता माणिक झोपेतून उठले असता त्यांना त्यांची कार घरासमोर उभी असलेली दिसली नाही. माणिक यांनी त्यांच्या कारचा जवळपासचा परिसर शोध घेतला आणि त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधला मात्र कार सापडली नाही. माणिक शेंडगे आज यांच्या फिर्यादीवरून अज्ञात कार चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.






Post a Comment

0 Comments