Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

कोद्री येथील राजेश लटपटे पहिल्याच प्रयत्नात सेट परीक्षा उत्तीर्ण





परभणी  ➡️ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे संपूर्ण महाराष्ट्रात घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय सेट अधिव्याख्याता पात्रता परीक्षेत गंगाखेड तालुक्यातील कोद्री येथील राजेश माणिकराव लटपटे हा विध्यार्थी जनसंवाद व वृत्तपत्रविद्या या विषयात सेट परीक्षा उत्तीर्ण झाला आहे. त्याने नुकतेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथील जनसंवाद व वृत्तपत्रविद्या विभागातून पदव्युत्तर पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे.  


औरंगाबाद विद्यापीठात पत्रकारितेचे शिक्षण घेत असताना त्याने सेट परीक्षेची तयारी करत हे यश संपादन केले आहे. राजेशच्या या पहिल्याच प्रयत्नात मिळवलेल्या यशाबद्दल त्याचे कौतुक करण्यात येत आहे. तसेच आई-वडील, गुरुजन आणि मित्र परिवाराकडून सर्वत्र अभिनंदन होत आहे.




Post a Comment

0 Comments