Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

औरंगाबाद शहरातील झोन क्रमांक 02, 07 आणि 09 मध्ये किऑस्क सेवा कार्यान्वित





औरंगाबाद ➡️ शहरातील नागरिकांना जलद, पारदर्शी व कार्यक्षम सेवा पुरवण्यासाठी औरंगाबाद स्मार्ट सिटी ने ई गव्हर्नन्स प्रकल्पांतर्गत स्मार्ट किऑस्क बसवले आहेत. झोन क्रमांक 02, 07 आणि 09  च्या नागरिक सुविधा केंद्रांवर हे किऑस्क कार्यान्वित झाले आहेत आणि नागरिक याचा लाभ घेत आहेत. 



मालमत्ता कर, पाणी पट्टी भरणे, तक्रार नोंदणी, जन्म, मृत्यू व लग्नाचे प्रमाणपत्र प्राप्त करणे, विविध परवाने काढण्यासाठी आता नागरिकांना ई गव्हर्नन्स प्रकल्पामुळे घरी बसल्या मोबाईल वर नोंदणी करता येणार आहे. 



महापालिकेच्या http://aurangabadmahapalika.org/ ह्या संकेस्थळावर ही सुविधा उपलब्ध आहे. अशी माहिती औरंगाबाद स्मार्ट सिटी चे प्रकल्प अभियंता फैज अली यांनी दिली आहे.



 "ई गव्हर्नन्स मुळे एक तक्रार यंत्रणा विकसित केली जात आहे. ज्या विभागाशी निगडीत तक्रार आहे त्या विभागाला तक्रार प्राप्त होईल. आणि कर्मचाऱ्यांनी वेळेवर समस्येवर कारवाई न केल्यावर ती तक्रार वरिष्ठांकडे आपोआप हस्तांतरित होणार आहे.




Post a Comment

0 Comments