Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

गंगाखेडजवळ सराफा व्यापार्‍यास लुटणारे आणखीन दोघे जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई





 परभणी  ➡️गंगाखेड-परभणी जाणार्‍या रोडवरील गोदावरी नदीच्या पुलाजवळ 19 जानेवारी व्यापारी सचिन रघुनाथराव टाक (वय 38 वर्षे व्यवसाय- सोनेचांदी व्यापार रा. जिंतूर जि. परभणी) यांना दुचाकीवरील दोन अनोळखी इसमांनी ‘आमच्या महिलेस का छेडले? हे खोटे कारण सांगून चालत्या जिपमधून उतरवून त्यांच्याजवळील 35 तोळे सोने व 88 हजार रुपये रोख रक्कम चाकूचा धाक दाखवून मारहाण करून बळजबरीने लूटून नेले. यावरून संदर्भात पोलिसांनी एका संशयित आरोंपीला अटक करुन चौकशी केली असता या चोरी प्रकरणात अन्य दोन आरोपीं समावेश असलेली माहिती दिली आहे.  गंगाखेड पोलिसांनी यातील आणखीन दोन अनोळखी आरोपीवर कलम 392, 34 भादंविप्रमाणे अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. 




पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार 19 जानेवारी रोजी व्यापारी सचिन रघुनाथराव टाक हे जीप मध्ये बसून आपल्या गावाकडे निघाले होते.  दोन अनोळखी इसमांनी ‘आमच्या महिलेस का छेडले? हे खोटे कारण सांगून चालत्या जिपमधून उतरवून त्यांच्याजवळील 35 तोळे सोने व 88 हजार रुपये रोख रक्कम चाकूचा धाक दाखवून मारहाण करून बळजबरीने लूटून नेले. या संदर्भ गंगाखेड पोलिसांनी  एका आरोपीला पोलिसांनी अटक केली होती. 



या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक सुनिल माने हे करीत आहेत. या गुन्हयाची गंभीरता लक्षात घेऊन पोलीस अधिक्षक जयंत मिना यांनी स्थानिक गुन्हे शाखेस गुन्हा लवकरात लवकर उघडकीस आणण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्यानुसार सपोनि. व्यंकटेश्वर आलेवार यांनी गुन्हा उघडकीस आणण्याचे दृष्टीने स्थानिक गुन्हे शाखेचे दोन पथक तयार करुन सराफा व्यापार्‍याने दिवसभर केलेला प्रवास व त्या दरम्यान केलेले व्यापार याची माहिती घेऊन एकूण 11 ठिकाणच्या सिसिटीव्ही फुटेजचा बारकाईने अभ्यास केला. पोलीस उपनिरीक्षक साईनाथ पुयड, पोलीस अंमलदार महेश कौठाळे , किशोर चव्हाण , राहूल परसुडे , परसराम गायकवाड  हे आरोपी बाबत माहिती काढत असताना यातील आरोपी हे गंगाखेड शहरातील राहणारे असून त्यांनी व्यापार्‍याची इत्यंभूत माहिती गोळा करून हा गुन्हा केल्याची माहिती मिळाली.





त्यानुसार पथकाने गंगाखेड शहरातील आरोपी  आदित्य उर्फ मुन्ना संजय साळवे (वय 22 वर्षे रा.आंबेडकरनगर, गंगाखेड) यास शिताफीने ताब्यात घेऊन त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने हा गुन्हा आरोपी कृष्णा दत्ता गळसिंगे (वय 21 वर्ष रा.शेटेगल्ली, गंगाखेड) याच्यासोबत मिळून केला असून त्यांना या फिर्यादीच्या हालचालींबाबत आरोपी रघुनंदन बन्सीलाल काबली (वय 19 वर्षे रा. तिरुपतीनगर, गंगाखेड) याने माहिती पुरविल्याचे निष्पन्न झाल्यावरुन श्री साईनाथ पुयड, पोलीस अंमलदार महेश कौठाळे, किशोर चव्हाण, राहुल परसुडे, परसराम गायकवाड यांच्या मदतीने पोउपनि नागनाथ तुकडे, पोलीस अंमलदार जक्केवाड, बालासाहेब तुपसुंदरे, हरिश्चंद्र खुपसे, दिलावर पठाण, अझहर शेख, संतोष सानप, सिध्देश्वर चाटे, नामदेव डुबे, राम पौळ यांनी सापळा रचून आरोपी नामे कृष्णा दत्ता गळसिंगे, रघुनंदन बन्सीलाल काबली यांना ताब्यात घेतले. 





या आरोपीकडून त्यांनी चोरलेला 345 ग्रॅम वजनाचे सोने व रोख 60 हजार रुपये तसेच टाक यांचा चोरलेला मोबाईल, आरोपीने वापरलेल्या दोन दुचाकी, चाकू जप्त करण्यात आला आहे. या गुन्हयात एकुण तीन आरोपी निष्पन्न  झालेले आहेत. हा अत्यंत क्लीष्ट असलेला गुन्हा स्थानिक गुन्हे शाखेने अतिशय कठोर परिश्रम घेऊन अवघ्या पाच दिवसात उघड करुन मुद्देमाल हस्तगत केला आहे.  




ही कामगिरी पोलीस अधीक्षक जयंत मिना, अपर पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक श्री. व्यंकटेश्वर आलेवार, स.पो. नि . सुनिल माने , पोउपनि साईनाथ पुयड, संतोष सिरसेवाड, नागनाथ तुकडे, मारोती चव्हाण, पोलीस अंमलदार जक्केवाड, तुपसुंदरे , महेश कौठाळे , किशोर चव्हाण , राहुल परसुडे , परसराम गायकवाड , हरीचंद्र खुपसे , दिलावर पठाण, अझहर शेख , संतोष सानप , सिध्देश्वर चाटे , दिपक जाधव , अनिस कौसडीकर , स.मोबीन , रवि जाधव , सातपुते , ढवळे , नामदेव डुबे , राम पौळ , निळे , घुगे , गणेश कौटकर यांनी मिळून केली आहे. 






Post a Comment

0 Comments