Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेत श्री शिवाजी महाविद्यालयाचा स्वराज पवार सर्वद्वितीय




 परभणी  ➡️ स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेडच्या वतीने आजादी का अमृत महोत्सव निमित्ताने घेण्यात आलेल्या आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेत येथील श्री शिवाजी महाविद्यालयाचा विद्यार्थी स्वराज पवार सर्वद्वितीय आला आहे.



आजादी का अमृत महोत्सव निमित्ताने डिसेंबर महिन्यात 'अंधार फार झाला पणती जपून ठेवा, घडवूया उद्याचा भारत' या विषयावर ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. दोन हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र असं या बक्षिसाचे स्वरूप आहे. स्वराज पवारने आतापर्यंत विविध आंतरमहाविद्यालयीन, विद्यापीठस्तरीय, राज्यस्तरीय वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धेत बक्षिसे प्राप्त केली आहेत. या स्पर्धेत विद्यापीठ परिक्षेत्रातील बहुसंख्ये विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.



त्याच्या या यशाबद्दल महाविद्यालय विकास समितीचे प्रमुख सदस्य हेमंतराव जामकर, प्राचार्य डॉ. बाळासाहेब जाधव, उपप्राचार्य डॉ. श्रीनिवास केशेट्टी, उपप्राचार्या डॉ.विजया नांदापूरकर, गुणवत्ता हमी कक्षाचे डॉ. रोहिदास नितोंडे, प्रबंधक विजय मोरे तसेच सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.जयंत बोबडे, डॉ.दिगंबर रोडे  आदींनी अभिनंदन केले.


फोटो कॅपशन: स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेत श्री शिवाजी महाविद्यालयाचा स्वराज पवार सर्वद्वितीय आल्याबद्दल अभिनंदन करताना प्राचार्य डॉ.बाळासाहेब जाधव, सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ.जयंत बोबडे दिसत आहेत.





Post a Comment

0 Comments