Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

येरगी येथे मन की बात कार्यक्रमाचे आयोजन




खा.प्रताप पाटील चिखलीकर यांची उपस्थिती

 देगलुर  ➡️ देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांचा आंतरराष्ट्रीय,राष्ट्रीय घडमोडीचा उहापोह, नाविन्यपुर्ण कार्याचा आढावा देणे, तरुण, उद्योजक, शेतकरी, कष्टकरी यांना योग्य ते मार्गदर्शन तथा समस्त भारतीयांशी सुसंवाद साधणारा "मन की बात" आकाशवाणी वरुन प्रसारीत होणारा कार्यक्रम उतरोत्तर लोकप्रिय होत आहे. हा कार्यक्रम 30 जानेवारी रोजी होणार असून या कार्यक्रमाचे थेट प्रसारण ऐकण्यासाठी नांदेड जिल्ह्याचे खासदार मा.प्रताप पाटील चिखलीकर यांनी देगलूर तालुक्यातील सीमावर्ती भागातील मौ.येरगी  येथील ग्रामस्थासमवेत हा कार्यक्रम ऐकणार आहेत.





सर्व सामान्य भारत वासीयांच्या गरजा व त्याचे निराकरण, विविध औद्योगीक, सामाजिक, शैक्षणिक, शेती, लघुउद्योजक व कामगार आदींना केंद्र व राज्यशासनाच्या उपक्रमाची माहिती मिळावी या हेतूने जानेवारी 2015 पासून *"मन की बात"* हा कार्यक्रम सुरु करण्यात आला असून तो 29 भाषामधून महिण्याच्या शेवटच्या रविवारी होत असतो. 30 जानेवारी 2022 रोजी "मन की बात" या कार्यक्रमाचा 86 वा भाग असून प्रसार भारती आपल्या विविध डी.डी.चॅनल्सवर प्रसारीत करणार आहे. 





तो कार्यक्रम ऐकण्यासाठी नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार मा.प्रताप पाटील चिखलीकर, महाराष्ट्र प्रदेश भाजपा निमंत्रित सदस्य तथा मा.आमदार सुभाष साबणे, भाजपा नांदेड जिल्हाध्यक्ष मा.व्यंकटराव पाटील गोजेगाकर, महाराष्ट्र प्रदेश भाजपा निमंत्रित सदस्य तथा दिव्यांग प्रकोष्ठचे प्रदेश प्रभारी रामदास पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष शिवाजी कनकंटे हे येरगी ता.देगलूर उपस्थित राहणार आहेत. तरी या कार्यक्रमासाठी भाजपा कार्यकर्ते व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सरपंच प्र.तथा भाजपा कार्यकर्ता संतोष पाटील यांनी केले.






Post a Comment

0 Comments