Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

वै. धुंडा महाराज देगलूरकर महाविद्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभक्तीपर कार्यक्रमाचे आयोजन




देगलूर ➡️  26 जानेवारी 2022 रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त वै. धुंडा महाराज देगलूरकर महाविद्यालयात मुक्ताई प्रतिष्ठानचे सचिव मा. राजेश महाराज देगलूरकर यांच्या उपस्थितीत प्राचार्य डॉ. विजय कुलकर्णी यांच्या हस्ते सकाळी ठीक 07.35  वा. ध्वजारोहण संपन्न झाले. ध्वजारोहणानंतर राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. कारिकंटे गणपत, यांच्यातर्फे प्रथम संविधानातील प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले आणि सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांतर्फे  संविधानाला स्मरून  प्रतिज्ञा घेण्यात आली.  




भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून विविध देशभक्तिपर उपक्रमाचे ही विशेष आयोजन याप्रसंगी करण्यात आले होते.   त्यामध्ये शेख साजिद, मरेवार अविनाश, पोलकमवाड विठ्ठल,  गोपालवार साईनाथ या विद्यार्थ्यांनी भारतीय सैनिकांच्या वेशभूषेत जलवा, तेरा जलवा  या देशभक्तीपर गीतावर नृत्य सादर केले तर  शेख सना या विद्यार्थीनीने  ए वतन आबाद रहे तू हे देशभक्तीपर गीत गायले.  याशिवाय सांस्कृतिक समितीच्या डॉ.सौ. गायकवाड पुष्पा व डॉ. सौ नेरकर संजीवनी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी थोर ऐतिहासिक महापुरुषांच्या वेशभूषेत विविध कलाकृती सादर केल्या.  भारतमातेच्या वेशभूषेत कु. आरती गंगलवार,  राष्ट्रमाता जिजाऊ च्या वेशभूषेत कु.  अर्चना राठोड, काशीबाईच्या वेशभूषेत कु.  शेख सना,  रमाबाई आंबेडकर यांच्या वेशभूषेत कु. मयुरी शिंदे, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वेशभूषेत कु. ज्योती गायकवाड, झाशीची राणी लक्ष्मीबाईच्या भूमिकेत शेख जुबेदा,  सरदार वल्लभभाई पटेल यांच्या भूमिकेत आदित्य भांगे,  पंडित नेहरुंच्या भूमिकेत उमेश डावले, स्वामी विवेकानंद यांच्या भूमिकेत कु. सुप्रिया तलवारे इत्यादी विद्यार्थ्यांनी ऐतिहासिक महापुरुषांच्या वेशभूषेत अप्रतिम कलाकृती सादर केल्या.  




महाविद्यालयातील हिंदी विभागाच्या वतीने विभाग प्रमुख डॉ. गायकवाड पुष्पा, व डॉ. पाटील अभिमन्यू यांच्या मार्गदर्शनाखाली प्रेमचंद यांच्या स्वातंत्र्यलढ्याशी निगडीत विद्यार्थ्यांनी लिहलेल्या हिंदी कथांच्या हस्तलिखित ग्रंथाचे व डॉ. सौ. गायकवाड पुष्पा लिखित मध्ययुगीन तथा आधुनिक कवी या ग्रंथाचे प्रकाशन मा. सचिव राजेश महाराज देगलूरकर,  प्राचार्य डॉ. विजय कुलकर्णी,  उपप्राचार्य डॉ.  भडके दिलीप,  उपप्राचार्य  अवधाने संजय यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी प्राचार्य डॉ.  विजय कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या देशभक्तीपर उपक्रमाचे  कौतुक केले.






Post a Comment

0 Comments