Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

म.रा.शि.सं. महामंडळाच्या प्रलंबित प्रश्ना बाबत राज्य शिक्षण आयुक्तांना निवेदन 




 पुणे  ➡️ आज दि. 27 जानेवारी. 2022 रोजी महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाच्या प्रलंबित प्रश्ना बाबत राज्याचे शिक्षण आयुक्त मा. विशाल सोळंकी यांना निवेदन देण्यात आले. 



यात वेतनेतर अनुदान, पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती कार्यक्षेत्र मर्यादा, आर.टी.ई ची थकीत प्रतिपुर्ती त्वरीत द्यावी, लिपीक, सेवक, शारीरिक शिक्षण व कला विषय शिक्षक आणि ग्रंथपाल भरती करण्यास परवानगी द्यावी. या बाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. 



हे प्रश्न इयत्ता 10 वी व 12 वी परिक्षेपुर्वी सोडविले जावेत अन्यतः या परिक्षेसाठी संस्था चालक आपल्या शाळा उपलब्ध करुन देणार नाहीत असा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला.




 या वेळी पुणे विभाग शिक्षण संस्था महामंडळाचे अध्यक्ष गणपतराव बालवडकर, महामंडळाचे राज्य कार्यकारिणी सदस्य शरदचंद्र धारुरकर, राज्य कार्यकारीणी सदस्या सौ. जागृती धर्माधिकारी व महामंडळाचे पिंपरी चिंचवड शहर सचिव भोसले हे उपस्थित होते.





Post a Comment

0 Comments