Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

शेवटच्या पात्र लाभार्थ्याला घरकुल मिळेपर्यंत लढणार - आ.मेघना बोर्डीकर




परभणी ➡️ पंतप्रधान आवास योजनेतील अनेक पात्र लाभार्थी गावागाड्यातील राजकारणामुळे लाभापासून वंचित आहेत. कष्टकरी दुर्बल घटकांना घर देण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदींची महत्वाकांक्षी योजना आहे. या योजनेतही राजकारण करणारांवर कारवाई करावी या मागणीसाठी जिंतूरच्या आ. मेघना बोर्डीकर यांनी आज 26 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणीक उपोषण केले. जिल्ह्यातल्या शेवटच्या लाभार्थ्याला घरकुल मिळेपर्यंत आपला हा लढा सुरू ठेवण्याचा निर्धार याप्रसंगी आ. बोर्डीकर यांनी व्यक्त केला. 




जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या जिल्ह्या प्रकल्प संचालक सौ.रश्मी खांडेकर यांनी उपोषण स्थळी आ.बोर्डीकर यांची भेट घेऊन जिल्ह्यातील वंचित कुटुंबांना समावेश करण्या संदर्भाने जिल्हाधिकारी यांच्यासह जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी, सर्व गट विकास अधिकारी यांच्या सोबत बैठक करुन प्रश्न मार्गी लावण्याचे लेखी आश्वासन दिल्या नंतर आमदार बोर्डीकर यांनी आपले उपोषण आज स्थगित केले




जे कोणी पात्र लाभार्थ्यांना हक्काच्या घरा पासून दूर ठेवत आहे व ज्यांनी जाणीव पूर्वक दुर्लक्षित केले अशा बेजबाबदार अधीकार्यांवर कठोर कारवाई करुन वंचितांना घरकुल मिळेपर्यंत आपण हा लढा चालूच ठेवणार असल्याचे आ बोर्डीकर यांनी ठणकावून सांगितले. प्रशासकीय अधिकारी राजकिय पक्षाची बाजू घेऊन सामान्य जनतेवर अन्याय करत असतील तर त्यांना बोर्डीकर स्टाईलने उत्तर देऊ असा सज्जड दम आमदार बोर्डीकर यांनी दिला.



यावेळी महानगर अध्यक्ष आनंद भरोसे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष डॉ सुभाष कदम, प्रदेश सदस्य अँड. व्यंकटराव तांदळे, विठ्ठलराव रबदडे, संतोषराव मुरकुटे, डॉ.  विद्या चौधरी, संजय शेळके, मोहन कुलकर्णी, विलास बाबर, मधुकर गव्हाणे, आनंतराव बनसोडे, रंगनाथ सोळंके, उद्धवराव नाईक, भागवतराव बाजगिरे, आकाश लोहट, अर्जुन लटपटे, अरुण मुंडे, भागवत दलवे, शिव्हारी खिस्ते, शिवाजी बोचरे, बाळासाहेब जोगदंड, आणंतराव पारवे, कृष्णाजी सोळंके, परमेश्वर पाटील, दिलीप काळदाते, एन.डी.देशमुख, संजय कुलकर्णी, अर्जुन लटपटे, रोहित जगदाळे, कपिल फुलारी शिवहरी शेवाळे यांच्यासह घरकुलापासून वंचित राहिलेले शेकडो  लाभार्थी उपस्थित होते.







Post a Comment

0 Comments