Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

जलसंपदाच्या अभियंत्यांकडून निम्न दुधना कालव्याच्या रखडलेल्या कामाची केली पाहणी




*प्रहार जनशक्ती पक्षाने केली होती मागणी. 

 परभणी  ➡️ परभणी तालुक्यातील निम्न दुधना प्रकल्पअंतर्गत येणार्‍या उजव्या कालव्याच्या दुरुस्ती, कालव्यातील गाळ काढणे, मायनर व शेतचार्‍यांची रखडलेली कामे तत्काळ सुरू करण्याबाबत प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने यांनी पक्षाचे पदाधिकारी व साडेगाव, हिंगला व वाडी दमई येथील शेतकर्‍यांच्या शिष्टमंडळासह माजलगाव कालवा विभाग क्रमांक 10 चे कार्यकारी अभियंता प्रसाद लांब यांची भेट घेऊन निवेदन सादर केले होते व संबंधित कामे तत्काळ न केल्यास प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने कार्यालयास कुलूप ठोकण्याचा इशारा दिला होता. याच निवेदनाची दखल घेऊन कार्यकारी अभियंता यांच्या वतीने निम्न दुधना प्रकल्पाचे कनिष्ठ अभियंता पी.बी. गायकवाड, अभियंता व कालवा प्रभारी मनोज कंबोज यांनी आज 27 जानेवारी रोजी कालव्याच्या रखडलेल्या कामाची पाहणी केली.




प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने यांच्या सह निम्न दुधना कालव्यावरील साडेगाव, हिंगला व वाडी दमई येथील कालवा, मायनर व शेतचार्‍यांची पाहणी केली. या परिसरातील कालवा व मायनर हे झाडे व झुडपांनी भरलेले होते शिवाय त्यातील गाळ पण वेळेवर काढण्यात आला नव्हता त्याचबरोबर या कालव्यावरील मायनर व शेतचार्‍यांची अनेक कामे रखडलेली होती त्यामुळे सिंचन पूर्ण होत नव्हते व शेतचार्‍याचे कामे अर्धवट राहिल्याने शेतात पाणी शिरून शेतकर्‍यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत होते. 




या सर्व कामाची पाहणी केल्या नंतर संबंधित अधिकार्‍यांना प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी व परिसरातील शेतकर्‍यांनी चांगलेच धारेवर धरले. वरिष्ठ अधिकार्‍यांना परिस्थितीची माहिती प्रहार च्या वतीने देण्यात आल्यावर कालव्यातील गाळ सफाई, कालव्या शेजारील रस्ते, मायनर ची व शेत चार्‍यांची कामे रखडलेली कामे येत्या 08 दिवसात सुरू केली जातील असे आश्वासन कार्यकारी अभियंता यांनी दिले. मागील अनेक वर्षांपासून या परिसरातील कालव्याची व मायनर ची दुरुस्ती फक्त कागदावर केली जात होती.




आज प्रहार जनशक्ती पक्षाच्या पुढाकाराने परिसरातील रखडलेली कामे मार्गी लागण्याची मार्ग मोकळा झाला असून साडेगाव, हिंगला व वाडी दमई व परिसरातील शेतकर्‍यांना सिंचनसाठी पानी लवकरच उपलब्ध होईल.ङ्गया वेळीं प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने, युवा आघाडी जिल्हा प्रमुख गजानन चोपडे, तालुका प्रमुख बालासाहेब तरवटे, दिव्यांग आघाडी तालुका प्रमुख ज्ञानेश्वर पंढरकर, उपतालुका प्रमुख ज्ञानेश्वर पुंजारे, मीडिया प्रभारी नकुल होगे, वैभव संघई, परिसरातील शेतकरी महेश बोरामने, माधव तरवटे, माउली तरवटे, शरद तरवटे, विश्वनाथ तरवटे, महेश बिडकर, राहुल बिडकर, बाळासाहेब तरवटे, प्रसाद पवार, पांडुरंग विभुते, योगेश तरवटे, पांढरी बारहाते इत्यादी उपस्थित होते.






Post a Comment

0 Comments