Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

ह.टिपू सुलतान यांच्याबद्दल अपमानजनक वक्तव्य करणारे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर कायदेशीर कारवाई करा




विविध संघटनेचे तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन

जिंतूर ➡️ देशाचे पहिले मिसाईल मॅन इंग्रजांचे कर्दनकाळ महान शासन लोकहितवादी लोककल्याणकारी न्यायप्रिय राजा महामानव महान स्वांतत्रय सेनानी हजरत टिपू सुलतान यांच्याबद्दल महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडवणीस यांनी अपमानजनक वक्तव्य केल्यामुळे सर्व देशवासीयांच्या भावना दुखावल्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी शेर -ए- म्हैसूर हजरत टिपू सुलतान युवा मंच, स्वाभिमानी शेतकरी संघटना, हजरत टिपू सुलतान युवा मंच, हजरत टिपू सुलतान सेना,या संघटनेच्या वतीने दिनांक 28 जानेवारी शुक्रवार रोजी जिंतुर तालुक्याचे तहसीलदार माडगवडे यांच्या मार्फत मुख्यमत्र्यांना निवेदन देऊन करण्यात आली.




स्वतंत्र सेनानी हजरत टिपू सुलतान यांनी भारत देशासाठी इंग्रजांविरुद्ध लढताना शहीद होणे पसंत केले ते अखंड भारतीय एकतेचे प्रेरणास्त्रोत होते अशा भारत मातेच्या वीर सुपुत्र ह.टिपू सुलतान बद्दल अपमान जनक व्देषपुर्व असे खोटे विधान करून राज्यातील शांतता कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न करणारे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर कडक कारवाई करून निषेध नोंदविण्यात आला. 




या दिलेल्या निवेदनावर शेर-ए-म्हैसूर हजरत टिपू सुलतान युवा मंचचे जिल्हाध्यक्ष शेख नईमोद्दीन कौसडीकर, टिपू सुलतान सेना चे जिल्हाध्यक्ष शेख अहमद हजरत टिपू सुलतान युवा मंचचे जिल्हाध्यक्ष मुजाहेद कादरी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शहराध्यक्ष हरून खान पठाण शेर -ए-ह.टिपू सुलतान युवा मंचचे तालुका अध्यक्ष नईम पठान, तालुका उपाध्यक्ष शेख गौस जाबेर मुल्ला,शेख सोहेल,सलीमोद्दीन काजी,इरशाद पाशा सिद्दीकी,आन्वर पटेल,शेख फैसल यांच्यासह अनेक नागरिकांचे स्वाक्षरी आहे.






Post a Comment

0 Comments