Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

चांगले आरोग्य व प्रतिष्ठेसाठी शौचालयाचा नियमित वापर गरजेचा - सीईओ शिवानंद टाकसाळे




परभणी ➡️ परिसर अस्वच्छता आणि उघड्यावरच्या हागणदारीमुळे अतिसार, कॉलरा, कावीळ, सार्स सारख्या दुर्धर आजारांना ग्रामीण भागातील नागरिकांना सामोरे जावे लागते तर घरात शौचालय नाही म्हणून महिलांना मानहानीचा सामना करावा लागतो. त्यामुळे नागरिकांनी चांगले आरोग्य आणि प्रतिष्ठेसाठी शौचालयाचा नियमित वापर करण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी केले आहे.



 

सीईओ टाकसाळे यांनी मनरेगाच्या विहिरीची केली पाहणी    

 सी. ई. ओ शिवानंद टाकसाळे यांनी गावातील लाभार्थी सरस्वती सोळंके यांच्या मनरेगा योजने अंतर्गत सुरु असलेल्या विहिरीची पाहणी करून मार्गदर्शन केले. विहिरीच्या बाबतीत कुठल्याही अडचणीची आपण शेतकऱ्यांसोबत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले तसेच तालुकास्तरावर गट विकास अधिकारी आणि ग्रामसेवक यांनी पुढाकार घेऊन जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विहिरींच्या कामामध्ये आवश्यक ती मदत करण्याच्या सूचना टाकसाळे यांनी दिल्या.





शुक्रवार दि. 28 जानेवारी 2022 रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी सार्वजनिक शौचालयाच्या उदघाटनाच्या निमित्ताने सेलू तालुक्यातील ढेंगळी पिंपळगाव या ग्रामपंचायतीला भेट दिली. यावेळी मनरेगा अंतर्गत सुरु असलेल्या विहिरीच्या कामाची पाहणी करून सुरु असलेल्या विहिरीच्या कामावर व सार्वजनिक शौचालयाच्या पूर्ण झालेल्या बांधकामावर टाकसाळे यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी सेलूचे गट विकास अधिकारी विष्णू मोरे, सरपंच केशव सोळंके, ग्रामसेविका पी बी होळे, मनरेगाचे कर्मचारी गोविंद चांदजकर यांच्यासह आदींची उपस्थिती होती.



याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी सार्वजनिक शौचालयाची आतून - बाहेरून, पाण्याची व्यवस्था, शोषखड्ड्याचे बांधकाम, उपलब्ध सोयीसुविधा आदींची सूक्ष्म पाहणी केली  आणि मार्गदर्शन करताना टाकसाळे म्हणाले कि, ग्रामीण भागातील नागरिकांची शौचालयाचा वापर करण्याची मानसिकता तयार होत आहे. त्यामुळे तालुकास्तरावरील यंत्रणांनी देखील नागरिकांना शौचालयाचा नियमितपणे वापर करण्यासाठी प्रवृत्त करण्याच्या सूचना दिल्या. तसेच सद्यस्थितीत ज्या नागरिकांना वैयक्तिक शौचालय नाही अशा नागरिकांनी सार्वजनिक शौचालयाचा नियमित वापर करण्याचे आवाहन केले.






Post a Comment

0 Comments