Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

सेलू येथे किराणा दुकानांमधून वाईन विक्रीस भाजपाचा विरोध




सेलू ➡️  किराणा दुकानात दारू वाईन विक्री करण्याचा आदेश राज्य सरकारने तातडीने मागे घ्यावा, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या संतप्त कार्यकर्त्यांनी आज 28 जानेवारी रोजी केली आहे.




सेलू येथील उपविभागीय अधिकार्‍यांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून महाराष्ट्र शासन महसूल वाढीसाठी किराणा दुकानांमध्ये वाईन विकण्याची परवानगी देणार आहे. त्यामुळे वाईन ही सर्रास कुठेही अन् केंव्हाही खुलेआमपणे मिळणार हे स्पष्ट आहे. परंतु, या प्रकाराने विद्यार्थीवर्ग, तरुणवर्ग व्यसनाच्या आहारी जाईल व आपली पिढी बरबाद होईल, याचे सोयरसुतक महाविकास आघाडी सरकारमधील पुढार्‍यांना नाही, हे दुर्देव आहे. 



इतर कोणत्याही राज्यात असा शासन निर्णय नाही केवळ गल्ला भरण्याकरीता कोणाच्यातरी हिताकरीता राज्य सरकारने हा निर्णय घेतला, हे स्पष्ट आहे. महाराष्ट्र सरकार महाराष्ट्राचा उडता पंजाब करायला तयार आहे. म्हणून शासनाच्या महसूल वाढीसाठी घेतलेला किराणा दुकानात दारू वाईन विकण्याचा निर्णय तात्काळ मागे घ्यावा, अन्यथा भारतीय जनता पार्टी व सर्व जनतेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असे निवेदनात म्हटले आहे.




यावेळी जिल्हा उपाध्यक्ष जयसिंग शेळके, कपिल फुलारी, संदीप बोकन, किशोर मुक्तावार, गणेश ढेंगळे, राजू सोळंके, बाळू काजळे, मनोज गोरे, अभि शिंदे, ऋषिकेश भरकड उपस्थित होते.





Post a Comment

0 Comments