Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

सोमवार पासून परभणी जिल्ह्यातील इयत्ता आठवीं पर्यंतची शाळा होणार सुरु




 


परभणी ➡️ कोरोना प्रादुर्भाव कमी आहे अशा भागातून निवासी शाळा व इयत्ता 1 ली ते 8 वी पर्यंतच्या शाळा सूरु करण्याची मागणी होत असल्याने जिल्हा अधिकार ऑचल गोयल यांनी आज 28 जानेवारी विशेष आदेशा अंतर्गत 31 जानेवारी पासून शाळा सूरु करण्यास परवानगी दिली आहे. याआधी जिल्ह्यातील  इयत्ता 9 वी ते 12 वी पर्यंतच्या शाळा सुरु करण्यात आली आहे. 




जिल्हात शासन आदेश दि.08.01.2022 अन्वये महाराष्ट्र राज्यात कोरोना (कोविड-19), ओमायक्रॉन विषाणू चे झपाट्याने संक्रमण होते असल्याने कोरोना (कोविड-19) विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी काही तातडीच्या उपाय योजनेचा भाग म्हणून दि. 10.01.2022 रोजी पासून जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश निर्गमित करण्यात आहेत. प्रतिबंधात्मक आदेशातील रकाना क्र.07 मध्ये जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालय व कोंचिगे क्लासेस हे 15 फेब्रुवारी 2022 पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. 





राज्यात कोरोना प्रादुर्भाव सर्व भागात सारख्या प्रमाणात नसल्याने व कोरोना प्रादुर्भाव कमी आहे अशा भागातून शाळा सुरु करण्याबाबत सातत्याने मागणी करण्यात येत असल्याने राज्यातील इयत्ता 1 ली ते 12 वी च्या शाळा स्थानिक परिस्थितीचा विचार करुन सुरु करण्याचे अधिकार स्थानिक प्राधिकरणास प्रदान केले आहेत. त्यानुसार दि. 24.01.2022 पासून जिल्ह्यातील इयत्ता 9 वी ते 12 वी पर्यंतच्या शाळा सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच निवासी शाळा व इयत्ता 1 ली ते 8 वी पर्यच्या शाळा सूरु करण्याची मागणी होत असल्याने जिल्ह्यातील शाळा सूरु करण्यास परवानगी जिल्हा अधिकारी ऑचल गोयल यांनी दिली होती. 




त्यांनी आज परभणी साथरोग प्रतिबंध कायदा 1897, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व शासन परिपत्रक दि. 20.01.2022 अन्वये प्राप्त अधिकारातून शाळा सुरु करण्यापूर्वी आरोग्य, स्वच्छता व इतर सुरक्षाविषयक उपाययोजनांबाबतच्या प्रस्तूत परिपत्रकातील परिशिष्ट- अ व परिशिष्ट- ब मधील मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करुन दि. 31.01.2022 रोजी पासून जिल्ह्यातील निवासी शाळा व इयत्ता 1 ली ते इयत्ता 8 वी पर्यंत सर्व शाळा सुरु करण्याची परवानगी दिली आहे. पण कोरोना लक्षण, ताप आणि खोकला  असलेल्या विद्यार्थींना पालकांनी शाळेत पाठवू नये. 


सदरील आदेशाचे पालन न करणारी/ उल्लंघन करणारी कोणतीही व्यक्‍ती, संस्था अथवा समुह यांनी साथरोग प्रतिबंधक कायदा 1897, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 तसेच भारतीय दंडसंहिता 1860 नुसार शिक्षेस पात्र असल्रेला अपराध केला असे मानण्यात येईल व नियमानुसार कारवाई करण्यात येईल.





Post a Comment

0 Comments