Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

शंभर किमी सायकलिंग करून जिंतूर रॅन्डोनिअर्स सायकल क्लबच्या सदस्यांनी साजरा प्रजासत्ताक दिन  





 * जिंतूर-सेलू-जिंतूर दरम्यान सायकलिंगने जनजागृती

जिंतूर ➡️ जिंतूर रॅन्डोनिअर्स सायकल क्लबच्या सदस्यांनी 73 व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून बुधवार 26 जानेवारी रोजी शहर व परिसरातील नागरिकांमध्ये सायकल चालविण्याची गोडी निर्माण व्हावी म्हणून जिंतूर-सेलू-जिंतूर दरम्यान सायकलवर राष्ट्रीय ध्वज लावून तब्बल 100 किमी सायकलिंग करून आरोग्यदायी प्रजासत्ताक दिन साजरा केला.



शहर व परिसरात वाढत असलेले प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी व नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून नागरिकांना सायकल चालविण्याकरिता प्रेरित करण्यासाठी जिंतूर रॅन्डोनिअर्स सायकल क्लबच्या वतीने विविध उपक्रम घेण्यात येत आहे.



याचाच एक भाग म्हणून 73 व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून नागरिकांमध्ये सायकल चालविण्याची गोडी निर्माण व्हावी. यासाठी क्लबच्या सदस्यांनी तिरंगी टीशर्ट परिधान करून सायकलवर राष्ट्रीय ध्वज लावून जिंतूर-सेलू-जिंतूर दरम्यान तब्बल 100 किमी सायकलिंग द्वारे सायकलिंग विषयी जनजागृती घडवून आणली. 



शिवाय नागरिकांमध्ये राष्ट्रप्रेम जागृत करण्याच्या उद्देशाने संबंध प्रवासादरम्यान राष्ट्रभक्ती गीते लावण्यात आली होती. या उपक्रमात क्लबचे अध्यक्ष व्यंकटेश भुरे, प्रा ज्ञानबा मापारी, आकाश अग्रवाल, राहुल भिसे, शहेजाद खान, शेख फुरखान आदींनी सहभाग घेतला होता.





Post a Comment

0 Comments