Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

लॉजवर अवैध पध्दतीने जुगार खेळणांऱ्या 07 जणांना अटक




 जिंतूर  ➡️ जिंतूर शहरांतर्गत जिंतूर-जालना रोडवरील जय भवानी लॉजवर अवैध पध्दतीने जुगार खेळणांऱ्या 07 जणांना जिंतूर पोलिसांनी 23 जानेवारी रोजी छापा मारून अटक केली. या जिंतूर पोलिसांनी एकुण 40 हजार 490 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. 


पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार जिंतूर-जालना मार्गावर असलेले  जय भवानी नावाच्या लॉजवर काही लोक अवैध पध्दतीने जुगार खेळत आहे अशी गुप्त माहिती मिळाली होती. याच माहितीनुसार उप विभागीय पुलिस अधिकारी पांडुरंग गोफणे यांच्या मार्गदर्शन खालील पोलिस काॅस्टेबल गजानन क्षीरसागर व गजानन रोकडे यांनी 23 जानेवारी रात्री 09 वाजता जय भवानी लाॅज वर छापा मारण्यात आले. 


यात जुगार खेळत असलेले जिंतूर शहरातील सुनिल कांबले, गौतम घनसावंत, रोहिदास राठोड, अजय रोकडे, रामा शिंदे, आशोक तोडकर व तालुक्यातील पाचलेगांव येथील व जय भवानी लाॅजचे मॅनेजरला रंगेहाथ अटक करण्यात आले. या कारवाईत एकूण 40 हजार 490 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या संदर्भात पोलिस काॅस्टेबल गजानन क्षीरसागर यांच्या फिर्यादीवरून या सात आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आले.





Post a Comment

0 Comments