Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

अनैतिक संबंधांना अडसर ठरणाऱ्या 14 वर्षीय मुलाचा आईने काढला काटा 




 जळगाव  ➡️अनैतिक संबंधांना अडसर ठरणाऱ्या 14 वर्षीय मुलाचा आईने प्रियकराकरवी खून करवून घेतला. ही घटना 10 दिवसांनंतर उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी मुलाच्या आईसह प्रियकराला अटक केली आहे. मुलास गळफास देऊन नंतर झाडाला लटकवून ठेवले होते.




प्राप्त माहितीनुसार जिल्ह्यातील सावखेडा शिवारातील एका कॉलनीत हा मुलगा कुटुंबीयांसह राहत होता. मुलाची 35 वर्षीय आई व प्रमोद जयदेव शिंपी (वय 38, रा. विखरण, ता. एरंडोल) यांच्यात काही वर्षांपासून प्रेमसंबंध होते. प्रमोद व मुलाची आई शेतीकाम करीत असताना त्यांच्यात ओळख झाली होती. पुढे दोघांमध्ये प्रेमसंबंध वाढले. ही बाब मुलास कळल्यानंतर त्याने विरोध दर्शवला. तो वारंवार आईला विरोध करीत असल्यामुळे दोघांमध्ये अडसर निर्माण होत होता. हा अडसर दूर करण्यासाठी दोघांनी नियोजन केले. या मुलास कबुतर पाळण्याचा छंद असल्यामुळे त्याला कबुतरांसाठी नवीन पिंजरा घेऊन देतो असा बहाणा करून 16 जानेवारी रोजी सकाळी 9.30 वाजता सकाळी प्रमोद याने त्याला दुचाकीवरून शहराच्या बाहेर नेले. 






तेथे निर्मनुष्य ठिकाणी प्रमोदने दाेरीने गळा आवळून त्या मुलाचा खून केला. त्यानंतर गळफास दिलेल्या अवस्थेतच त्याचा मृतदेह एका झाडाला लटकवून ठेवला. त्याच दिवशी रात्री प्रमोद जळगावात पोहोचला होता. इकडे मुलगा बेपत्ता झाल्याचा कांगावा करीत त्याच्या आईने तालुका पोलिस ठाण्यात धाव घेतली. वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस उपनिरीक्षक नयन पाटील या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.




दरम्यान, 08 दिवस उलटल्यानंतरही मुलाचा काहीच पत्ता लागत नव्हता. दुसरीकडे पोलिसांनी तांत्रिक माहिती गोळा करण्यास सुरुवात केली. 16 रोजी सकाळी संबंधित मुलगा कोणाशी बोलला होता. त्याच्या कुटूंबीयांचे कोणाशी बोलणे झाले. या सर्वांचे मोबाइल कॉल डिटेल पोलिसांनी मिळवले. संपूर्ण अभ्यास केल्यानंतर कुटुंबातील सदस्यांवर संशयाची सुई थांबत होती. त्यानुसार सर्वात आधी पोलिसांनी 25 जानेवारी रोजी रात्री प्रमोद शिंपी याला विखरण येथून ताब्यात घेतले. रात्रभर चौकशी केल्यानंतर त्याने दुसऱ्या दिवशी दुपारी गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर मुलाच्या आईला ताब्यात घेण्यात आले. दोघांच्या विरुद्ध खुनाचे कलम वाढवण्यात आले. या दोघांनाही अटक करण्यात आली आहे.





प्रमोद व मुलाच्या आईने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर बुधवारी रात्री तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक चंद्रकांत कुंभार, उपनिरीक्षक नयन पाटील, वासुदेव मराठे, विजय पाटील, सतीश हळणाेर, चेतन पाटील, विजय दुसाने, तुषार जाेशी, नाना माेरे, अशोक पाटील यांचे पथक अशिरगडच्या जंगलात पोहोचले. प्रमोद याने घटनास्थळ दाखवल्यानंतर 10 दिवसांपासून झाडाला लटकवलेला कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह पोलिसांनी पंचनामा करून ताब्यात घेतला. मृतदेहावर बऱ्हाणपूर (मध्य प्रदेश) येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले आहे.






Post a Comment

0 Comments