Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

परभणीचा कोव्हीडमुळे दर्गाह हजरत सय्यद शाह तुराबूल हक्क साहेब रहे उर्स रद्द




धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमास बंदी; 05 व्यक्तींच्या उपस्थितीत होणार गुसल व संदलचे धार्मिक विधी 

 परभणी  ➡️ शहरातील दर्गा हजरत सय्यद शहा तुराबूल हक्क साहेब रहे यांचा दरवर्षीप्रमाणे  31 जानेवारी ते 15 फेब्रुवारीपर्यत साजरा होणारा उर्स कार्यक्रम कोव्हीड- 19 व ओमायक्रॉनच्या पार्श्वभुमीवर या वर्षी साजरा होणार नाही, अशी माहिती जिल्हा वक्फ अधिकारी जिल्हा अधिकार्‍यांंनी दिली आहे.





एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे नागरिकांना कळविण्यात आले आहे की, महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळातर्फे दरवर्षी परभणी येथे दर्गाह हजरत सय्यद तुराबूल हक्क साहेब रहे यांचा उर्स दि. 31 जानेवारी ते 15 फेब्रुवारीपर्यंत साजरा केला जातो. त्यामध्ये धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक कार्यक्रम व क्रिडा स्पर्धांंचे आयोजन करण्यात येते. 




तसेच उर्सानिमित्त नागरिकांंच्या सोयी सुविधांकरिता दर्गा परिसरात रोषणाई करून विविध प्रकारची दुकाने, हॉटेल व झुले सजवले जातात. परंतू यावर्षी देखील कोव्हीड- 19 व ओमायक्रॉन या संसर्गजन्य रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाच्या आयोजनास बंदी घातलेली आहे. 




या संदर्भात जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी गुरुवारी (दि.27) त्यांंच्या दालनात उर्सनिमित्त बैठक आयोजित केली होती. त्यामध्ये कोव्हीड- 19 व ओमायक्रॉन या संसर्गरोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बैठकीमध्ये उर्सला नकार देण्यात आला. जिल्ह्यातील सध्यास्थितीचा विचार करता कोरोना व ओमायक्रॉन विषाणूचा संसर्ग अजून संपलेला नाही. 




तसेच कोरोना विषाणूची तिसरी लॉट येत आहे. या उर्सादरम्यान मोठ्या प्रमाणावर भाविक व नागरिक एकत्रित येतात. त्यामुळे कोरोना संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे दर्गा हजरत सय्यद शाह तुराबूल हक्क रहे. परभणी यांच्या उर्स यात्रेस परवानगी नाकारण्यात आलेली आहे. 




या पार्श्वभुमीवर दरवर्षीप्रमाणे होणारे उर्स कार्यक्रम यावर्षी होणार नाही. मात्र दर्गाह परिसरात फक्त धार्मिक विधी पार पाडण्यासाठी पाच लोकांच्या उपस्थितीत गुसल व संदलचे धार्मिक विधी जिल्हा वक्फ अधिकारी  यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडण्यात येणार आहे. 




कोव्हीड- 19 व ओमीक्रॉन या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सुचनाचे पालन करणे सर्व नागरिकांवर बंधनकारक असून नागरिकांनी याची दखल घेवून दर्गाह परिसरात गर्दी करू नये. आपल्या घरी स्वस्थ राहून शासनाच्या आदेशाचे पालन करून वक्फ मंडळास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा वक्फ अधिकार्‍यांनी केले आहे.




Post a Comment

0 Comments