Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

किरकोळ वादातून तरुणाच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार, तीन आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल





जिंतूर ➡️ तहसीलच्या पुंगळा गावात किरकोळ वादातून 22 वर्षीय तरुणाच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करून गंभीर जखमी केले. या संदर्भात तिघां आरोपींविरुद्ध 27 नोव्हेंबर रोजी जिंतूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्त आला आहे. 



पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुंगळा येथील ज्ञानेश्वर भुजंगराव जगताप (22) हे 25 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 08 वाजता शेजारी राहणाऱ्या काका बाळासाहेब कोंडीबा जगताप यांच्या घरी एकत्र जेवण करून बसले होते. त्याच दरम्यान, बाळासाहेबांचे शेजारी प्रभाकर रामराव जगताप व त्यांचा भाऊ रमेश रामराव जगताप हे घरासमोरील रस्त्यावर एकत्र आले. ज्ञानेश्वर यांचे काका बाळासाहेबांना शिव्या देत होते.


हा शिवीगाळ करण्याचा आवाज ऐकून ज्ञानेश्वर व बाळासाहेब घरातून बाहेर आले व प्रभाकर व रमेश यांना विचारले, तुम्ही का शिव्या देत आहेस? असे म्हणत आरोपी रमेश जगताप हा बाळासाहेबांना मारहाण करत होता. या दरम्यान काका बाळासाहेब हे ज्ञानेश्वर यांना आरोपींच्या तावडीतून वाचविण्याकरता  प्रयत्न केला. 



इतक्यात आरोपी प्रभाकरची पत्नी निला हिने घरातून कुळहंडी आणली आणि नंतर पती प्रभाकरला दिली. प्रभाकरने ज्ञानेश्वरच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करून ज्ञानेश्वरला गंभीर जखमी केले. परभणी जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेले ज्ञानेश्वर जगताप यांच्या जबानीच्या आधारे आरोपी प्रभाकर रामराव जगताप, रमेश रामराव जगताप, निलाबाई रामराव जगताप यांच्याविरुद्ध भादंविच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.






Post a Comment

0 Comments