Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

दोन हजार युवकांना देणार कौशल्य विकासाचे प्रशिक्षण




    ♦️ जिल्हयाचा कौशल्य विकास आरखडा तयार 

 ♦️ प्रशिक्षणात सहा प्रकारच्या सेवेचा समावेश 

  ♦️जिल्हाधिकाऱ्यांकडून कौशल्य विकासाचा आढावा 


वर्धा ➡️ बेरोजगार युवकांना स्वयंम रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी शासनाच्यावतीने कौशल्य विकास कार्यक्रम राबविण्यात येतो. या कार्यक्रमा अंतर्गंत जिल्हयाचा कौशल्य विकास आराखडा तयार करण्यात आला असून त्यानूसार दोन हजार युवकांना स्वयंम रोजगाराचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. 



जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी आज या कार्यक्रमाचा आढावा घेतला. अधिकाधिक युवकांना प्रशिक्षण देण्याचे निर्देश त्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. बैठकीला जिल्हा नियोजन अधिकारी राजीव निवतकर, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक संचालक भैयाजी येरमे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी प्रशांत विधाते, कारागृह अधिक्षक एस.आर.पवार, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक सागर आंबेकर, एमआयडीसी संघटनेचे अध्यक्ष प्रविण हिवरे, मंगेश चांदुरकर यादी उपस्थितीत होते. कौशल्य विकास कार्यक्रमा अंतर्गंत पाच सेक्टरचे 06 प्रकारच्या सेवेचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. 



या सेवांमध्ये संगणक दुरुस्ती, डाटा एन्ट्री ऑपरेटर, टेलरींग काम, विक्री व्यवसाय, सोशल मीडिया एक्झीकेटिव, सर्च इंजिन मार्केटीग एक्झीकेटिव या प्रशिक्षणाचा समावेश आहे. सदर प्रशिक्षण जिल्हयातील दोन हजार युवकांना देण्यात येणार आहे. प्रशिक्षण कार्यक्रमासाठी कौशल्य विकास आराखडा तयार करण्यात आला असून प्रशिक्षण घेणाऱ्या युवकांना प्रत्येकी 750 इतके मानधन सुध्दा देण्यात येणार आहे. जिल्हयाचा कौशल्य विकासाचा हा आराखडा 3 कोटी 62 लाख इतक्या रक्कमेचा आहे. यात प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांच्या माधनधनाचा सुध्दा समावेश आहे. मुख्यमंत्री महा आरोग्य कौशल्य कार्यक्रम कोरोना काळात आरोग्य सेवेसाठी कुशल मनुष्यबळाची मोठ्या प्रमाणावर आवश्यकता होती. 




हे मनुष्यबळ उपलब्ध होण्यासाठी मुख्यमंत्री महा आरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्या अंतर्गंत 300 उमेदवारांना आरोग्य सेवेचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. यातील 80 उमेदवारांना आचार्य विनोबा भावे ग्रामिण रुग्णालय सावंगी येथे तर जिल्हयातील 12 शासकीय रुग्णालयामध्ये प्रत्येकी 20 उमेदवांराना प्रशिक्षण दिले जात आहे. प्रधानमंत्री कौशल्य विकास योजने अंतर्गत सुध्दा कोविड विशेष हेल्थ केअर प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत असून 450 युवकांना आरोग्य सेवेचे प्रशिक्षण दिले जात आहे. कारागृह बंदींना कौशल्य प्रशिक्षण जिल्हा कारागृहात असलेल्या बंदींना स्वयंम रोजगाराच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा कारागृह व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्यावंतीने प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात यावा. कारागृहातून बाहेर पडल्यानंतर बंदींच्या हाताला रोजगार उपलब्ध झाला पाहिजे. सदर प्रशिक्षण तातडीने सुरू करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी दिले. जिल्हयाच्या संपुर्ण कौशल्य विकास कार्यक्रमाचा त्यांनी आढावा घेतला. 




 




Post a Comment

0 Comments