Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

प्रचलित धोरणानुसार अनुदान मिळवून देणारच - आ.विक्रम काळे 






परभणी ➡️ त्रुटी पूर्तता केलेल्या शाळांच्या याद्या वेतन अनुदानासह घोषित करुण येणाऱ्या हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागणी करण्यासाठी प्रयत्नशील असून आघाडी सरकार शाळांना प्रचलित धोरणानुसार अनुदान देणार आणि त्यासाठी नेहमीच मराठवाडा शिक्षक आ.विक्रम काळे यांची आग्रही भूमिका असल्याचे शिक्षक दरबार प्रसंगी सांगितले. 


राष्ट्रवादी शिक्षक संघाच्यावतीने औरंगाबाद विभाग शिक्षक आ.विक्रम काळे यांचा प्रत्येक जिल्ह्यात दर दोन महिन्याला होत असलेला शिक्षक दरबार मात्र कोरोणा महामारीमुळे दीड वर्षांनी शहरातील जि.प. कन्या प्रशाला येथे दि. 29 ऑक्टोबर रोजी घेण्यात आला. 


यावेळी आ. विक्रम काळे, माध्यमिक शिक्षणाधिकारी आशाताई गरुड, प्राथमिक शिक्षणाधिकारी डी. एस. पोले, उपशिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे, वेतन पथक अधीक्षक विष्णु सानप, भातलवंडे, सीनियर कोषागार विक्रम देशमुख, राष्ट्रवादी संस्थाचालक संघ मराठवाडा अध्यक्ष विक्रम देशमुख, ज़िल्हाध्यक्ष मा. मा.सुर्वे, प्रा.मगदुम, नारायण चौधरी, आदिंची उपस्थिती होती. 


यावेळी पुढे बोलताना आ.विक्रम काळे म्हणाले की कायम शब्द वगळलेल्या एकही प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा व वर्ग तुकडी अनुदानापासून वंचित राहू नये यासाठी प्रयत्न करून सर्व प्रस्ताव शिक्षण संचालक कार्यालय पुणे येथे सादर झालेले असून तेथील तपासणीचे काम अंतिम टप्प्यात आहे. 



लवकरच पात्र शाळांच्या याद्या जाहीर केल्या जातील. तसेच 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी सेवेत आलेल्या शिक्षक- कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी नियुक्त केलेल्या संम्यक समितीला अहवाल देण्यासंदर्भात शासनाच्यावतीने स्पष्टपणे आदेशित करण्यात आले आणि त्यांचे सुधारित पत्र सुद्धा आपण काढल्याचे आ. विक्रम काळे यांनी सांगितले. शासन अनुदान येऊन सुद्धा शिक्षक-कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर होत नाहीत याबाबत शिक्षण विभागाबाबतीत नाराजी व्यक्त केली.



यापुढे प्रत्येक महिन्याच्या 05 तारखेच्या आत कुठल्याही शिक्षक- कर्मचाऱ्यांचे वेतन व्हायला पाहिजे याबाबतीत प्राथमिक, माध्यमिक शिक्षण अधिकाऱ्यांना सूचना केल्या. यावेळी प्रास्ताविक ज़िल्हाध्यक्ष मा. मा.सुर्वे यांनी केले. सूत्रसंचालन रामप्रसाद अवचार तर आभार गोपाळराव भुसारे यांनी मानले. 



कार्यक्रम यशस्वीतेसाठी गुलाब कदम,शांतिलिंग काळे,सदाशिव होगे,वसंत मोरे, अनंत काळे, बालाजी सुर्वे, देवा महाजन, प्रा.राजू जंपनगिरे, विष्णु मोपकर,बशीर अहेमद आदिसह राष्ट्रवादी शिक्षक संघ पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.




Post a Comment

0 Comments