Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

दिव्यांग बँक अधिकारी जिवाजी वाघमारे यांचा पुरस्कार वितरण व गौरव सोहळा कार्यक्रम






परभणी ➡️ दि. 30 ऑक्टोबर सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्या बद्दल महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे दिव्यांग असलेले क्षेत्रीय अधिकारी जिवाजी रंगनाथराव वाघमारे यांचा दि. 31 ऑक्टोबर 2021 रोजी पुरस्कार वितरण व गौरव सोहळा कार्यक्रम परभणीत संपन्न होणार आहे. 


संत गाडगे बाबा कर्मभूमी सेवा प्रतिष्ठान व नेहरू युवा मंडळ मूर्तिजापूर जि. अकोला यांच्या वतीने दिनांक 31 ऑक्टोबर 2021 रोजी दुपारी 4.00 वाजता राहुल नगर येथील सुभेदार रामजी आंबेडकर सभागृहामध्ये पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे असणार आहेत तर उद्घाटक म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ श्याम शिरसाट हे असणार आहेत.


कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती रामराव उबाळे, नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी शशांक राहुला, अप्पर कोषागार अधिकारी ज्योती बगाटे, सेवानिवृत्त गट विकास अधिकारी तुळशीराम जाधव, आदर्श शिक्षक मुकेश अंधारे, संभाजी शेवटे, माणिकराव अंधारे, संत गाडगेबाबा यांचे पणतू व संत गाडगेबाबा कर्मभूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष सतीश सोनोने, कार्याध्यक्ष प्रशांत हजारी, पत्रकार प्रा अविनाश बेलाडकर, ॲड सुरेश धबाले यांची उपस्थिती लाभणार आहे.



🔹️दिव्यांग बँक अधिकारी जिवाजी वाघमारे यांचा परिचय🔹️

दिव्यांग बँक अधिकारी जिवाजी वाघमारे यांनी आपल्या अंधत्वावर मात करून स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून श्रेणी एकचे पद मिळवले, कोविड काळात गरजू व्यक्तींना अन्नधान्याचे वाटप केले. आपला वाढ दिवस साधेपणाने साजरा करत गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप आणि वृक्षांची लागवड करणे असे विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले आहेत त्याच बरोबर ते एक उत्कृष्ट कवी देखील आहेत.

 


🔹️कार्यक्रमात यांचाही होणार गौरव 🔹️

दिव्यांग अधिकारी जिवाजी वाघमारे यांना शैक्षणिक व सामाजिक कार्यात सहकार्य केल्या बद्दल पत्रकार गणेश पांडे, मंचक खंदारे, बबीता चारण, सुनीता अहिरे, पूजा हातागळे, सूर्यकांत मोटे यांचा देखील गौरव करण्यात येणार आहे. सदर गौरव सोहळा कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन संत गाडगेबाबा कर्मभूमी प्रतिष्ठानचे सचिव अनिल डाहेलकर, कार्याध्यक्ष नरेंद्र खवले यांनी केले आहे.


 




Post a Comment

0 Comments