Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

पालम तालुक्यातील खडी येथे ऐन दिवाळीच्या तोडांवर शेतातील आखाड्या वरील घराला आग





पालम  [आरूणा शर्मा ]  ➡️ तालुक्यातील खडी येथे ऐन दिवाळीच्या तोडांवर दि.30 अँक्टोबर रोजी सकाळी  10 वाजेच्या दरम्यान उत्तम गुनाले यांच्या शेतातील घराला अचानक आग लागली. 


या आगीमुळे घरातील साहित्य व शेतीसाठी अनलेले खताचे पोते व साहित्य एक मोटार 5 एच.पी, तुषार पाईप सेट, वायर, शावर, पेरणी यंत्र, फवारे, शेतीच्या कामासाठी लागणारे आवजारे, दहा क्विंटल कापूस, सोयाबीन, व इतर साहित्य जळून खाक झाले आहे.


शेताच्या बाजूला काम करणाऱ्या शेतकऱ्यांनी आग विजविण्याचा प्रयत्न केला. पण आगेने रुद्र रुप धारण केले असल्यामुळे सर्वजण आग विजवण्यास अपयशी ठरले कारण जेथे आग लागली. तेथे पाण्याचा हाऊद भारूण होता मात्र पाणी घेण्यासाठी काही नव्हते. याचे कारण ज्या घराला आग लागली त्या घरातील साहित्य जळून खाक झाले होते. 


मात्र आजू बाजूला कोनत्याच शेतकऱ्यांचे आखाडो नसल्याने सर्व साहित्य असख्य नागरीका समोर जळून खाक झाले खडी येथिल शेतकरी उत्तम गोपालराव गुणाले व विनोद उत्तमराव गुणाले यांनी पालम तहसीलदार यांना नुकसान भरपाईसाठी आर्ज दिले आहे. यात एकुण 5 लाखाचे नुकसान झाले आहे.  तरी प्रशासनाने त्वरीत या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दयावी अशी मागणी खडी येथिल नागरीकाच्या वतीने करण्यात आली आहे




Post a Comment

0 Comments