Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

प्रहार जनशक्ती पक्षाच्या प्रयत्नाने बंद अवस्थेतील मासिकॉल प्रकल्प सुरु करण्याच्या हालचालींना वेग




उद्योगमंत्री मा.ना.सुभाषजी देसाई यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्याची मा.ना. बच्चूभाऊ कडू यांची लेखी विनंती

परभणी ➡️ 21 ऑक्टोंबर रोजी प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने यांनी मुंबई येथे मा.ना. बच्चुभाऊ कडू यांची मुंबई येथे भेट घेऊन बंद मॉसिकॉल प्रकल्पाबाबत सविस्तर माहिती दिली. त्यानंतर राज्यमंत्री मा.ना. बच्चुभाऊ कडु यांनी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना या संबंधीत स्वता:च्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्याची लेखी विनंती पत्र राज्यमंत्री बच्चू कडू यांनी 26 ऑक्टोंबर रोजी पाठविले आहे. त्यामुळे मॉसिकॉल प्रकल्प सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.


प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने यांनी पक्षाच्या शिष्टमंडळासह प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री मा.ना. बच्चुभाऊ कडु यांची काही दिवसापूर्वी अकोला येथे भेट घेतली होती. या भेटी दरम्यान परभणीमध्ये बंद पडलेल्या खाद्यतेल निर्मिती व प्रक्रिया करणारा परभणी एम.आय.डी.सी. मधील माँसिकॉल प्रकल्पावर वर चर्चा झाली. यात मा.ना. बच्चुभाऊ कडु यांना जिल्हयातील औद्योगिक मागासलेपणा दूर करण्यासाठी, बरोजगारी निर्मितीसाठी व शेतीमालाला भाव मिळून देण्यासाठी महत्वपुर्ण असलेल्या मॉसिकॉल प्रकल्प सुरु करणे हे परभणी जिल्हयाच्या औद्योगिक कृषी विकासासाठी किती महत्वाचे आहे. या बाबत सविस्तर माहिती देण्यात आली.





या वेळी मा.ना. बच्चूभाऊ कडू यांनी संपूर्ण माहिती घेऊन मुंबई ला भेटा असे निर्देश दिले त्या नुसार दिनांक 21 ऑक्टोंबर रोजी प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने यांनी मुंबई येथे मा.ना. बच्चुभाऊ कडू यांची मुंबई येथे भेट घेऊन मॉसिकॉल प्रकल्पाबाबत सविस्तर माहिती असलेला प्रस्ताव त्यांना दिला. या प्रस्तावावर मा.ना. बच्चुभाऊ कड्डु राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी सकारात्मकता दाखवली व मॉसिकॉल प्रकल्प सुरु करण्याबाबत महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री मा.ना. सुभाषजी देसाई साहेब यांना तत्काळ पत्र देऊन परभणी जिल्हयातील विकासासाठी बहुमुल्य योगदान देऊ शकणाऱ्या व सध्या बंद अवस्थेत असलेला माँसिकॉल प्रकल्प सुरु करण्याबाबत मा.ना. सुभाषजी देसाई साहेब, उद्योगमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली संबंधीत विभागातील वरिष्ठ अधिकारी एम.आय.डी.सी. चे अधिकारी, मा.ना. बच्चुभाऊ कडु राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य व प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हा प्रमुख शिवलिंग बांधने यांची संयुक्त बैठक आयोजित करण्याबाबत विनंती केली आहे. 



मा. ना. बच्चुभाऊ कडु, राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य व प्रहार जनशक्ती पक्षाच्या या प्रयत्नामुळे मासिकॉल प्रकल्प सुरु करण्यासाठी हालचालींना वेग आला असून परभणी जिल्हयातील अनेक वर्षापासून बंद अवस्थेत असलेल्या परभणी एम.आय.डी.सी. येथील मॉसिकॉलचे तेल शुध्दीकरण केंद्र व तेल निर्मिती कारखाना, गंगाखेड व हिंगोली येथील मॉसिकॉल अंतर्गत येणारे व तेल निर्मिती कारखाने देखील सुरु होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. हा प्रकल्प सुरु झाल्यास परभणी व हिंगोली दोन्ही जिल्हयातील तेलबिया उत्पादन करणा-या शेतकर्यांच्या मालाला चांगला भाव मिळणार असून दोन्ही जिल्हयामध्ये मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होणार आहे. 



प्रकल्प सुरु करण्याबाबत प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने यांनी पुढाकार घेतला असून या बाबत सविस्तर माहिती पण त्यांनी संकलित केली आहे. मा.ना. बच्चुभाऊ कडू यांना अकोला येथे भेटलेल्या शिष्टमंडळामध्ये जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने, युवा आघाडी जिल्हा प्रमुख गजानन चोपडे, तालुका प्रमुख बालासाहेब तरबटे, युवा आघाडी तालुका प्रमुख शिवाजी चव्हाण, शेतकरी आघाडी तालुका प्रमुख नारायण ढगे, मिडिया प्रभारी, नकुल होंगे, दिव्यांग आघाडी तालुका प्रमुख ज्ञानेश्वर पंढरकर, लोहगाव सर्कल प्रमुख मंगेश वाकोडे, झरी सर्कल प्रमुख शाम भोंग, अरुण कांबळे, रामेश्वर जाधव, वैभव संघई, अंकुश खंदारे इत्यादी उपस्थित होते .






Post a Comment

0 Comments