Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

संभाजी ब्रिगेड शिक्षक संघटनेने आमदार विक्रम काळे यांच्या शिक्षक दरबारात घातला गोंधळ 





परभणी ➡️ आज परभणी येथे शिक्षक आमदार विक्रम काळे यांचा शिक्षक दरबार आयोजित केला होता. या दरबारात संभाजी ब्रिगेड संघटनेचे जिल्हाध्यक्ष बालाजी मोहिते, महानगर जिल्हा अध्यक्ष गजानन जोगदंड , शिक्षक संघटना जिल्हा अध्यक्ष सद्दाम बागवान यांनी विनाअनुदानित शिक्षकांच्या प्रश्नासाठी तुम्हाला अनेक निवेदन दिले पण अध्याप प्रश्न सुटले नाहीत याचा जाब विचारतात एकच गोंधळ उडाला. त्यामुळे आमदार साहेब यांना अचानक दणका बसला. 






1) यात आमदार साहेबांना त्रुटी च्या अपात्र शाळांची यादी कधी लागणार असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा आमदार साहेबांनी अपात्र याचा प्रश्न याच अधिवेशनात निधीच्या तरतुदी सह सुटेल असा ठाम शब्द दिला.

2) प्रचलित धोरण कधी लागू करणार असे विचारता तो मी शब्द दिला आहे तो पण लवकरात लवकर पूर्ण करेल असा शब्द दिला. 

3) सेवासंरक्षण चा प्रश्न विचारला असता त्याचे उत्तर आमदार साहेबानी दिले नाही.




यावेळी संभाजी ब्रिगेड च्या जिल्हाध्यक्ष यांनी विनाअनुदानित शिक्षकांचे प्रश्न जर या अधिवेशनात नाही सुटले तर तुम्हाला प्रचार करू दिला जाणार नाही तुमच्या सर्व सभा उधळून लावण्याचा इशारा देण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष बालाजी मोहिते, महानगर जिल्हाध्यक्ष गजानन जोगदंड, संभाजी बिग्रेड शिक्षक संघटना जिल्हाध्यक्ष सद्दाम बागवान सर, शिक्षक समन्वक दीपक कुलकर्णी, परभणी जिल्हा अपात्रचा शिक्षकांचा वाघ टोंगराव, विनायक मगर असंख्य बांधव उपस्थित होते.






Post a Comment

0 Comments