Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

युवा सेनेतर्फे इंधन दरवाढीच्या विरोधात परभणी जोरदार सायकल रॅली; केंद्रावर आरोप





परभणी ➡️ शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्यजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली येथील युवासेनेच्या पदाधिकार्‍यांसह कार्यकर्त्यांनी रविवारी (दि.31) शहरातून पेट्रोल- डिझेल - गॅस इंधन दरवाढ विरोधात जोरदार सायकल रॅली काढली. 


शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून सकाळी 11 वाजता रॅलीस सुरुवात झाली. शहरातील सर्व युवासेना पदाधिकारी - युवासैनिकांनी एकत्र येवुन शहरातील मुख्य रस्त्यावरुन सायकल रॅली काढली. इंधन दरवाढी विरोधात केंद्र सरकार विरोधी घोषणा देत तीव्र निषेध व्यक्त केला. 


 यावेळी युवासेना जिल्हा प्रमुख अर्जुन सामाले यांच्या नेतृत्वाखाली शहर प्रमुख विशू डहाळे, बाळराजे तळेकर, हिंदूंवॉरीअर्सचे प्रदीप भालेराव, तालुका प्रमुख संदीप झाडे, पप्पू वाघ, उपजिल्हा प्रमुख दामोदर घुले, वीरेंद्र बांगर, शुभम पाष्टे, महेश येरळकर, तुषार चोभारकर, ऋषीकेश सावंत, गणेश मुळे, अरबाज शेख, मकरंद कुलकर्णी, दीपक राठोड, अरुण यादव, अमोल देशमुख, मुंजा अवचार, माणिक मचाले, राहुल ठाकूर, प्रवीण टेकाळे, यश ओझा, अर्जुन रनेर यांच्यासह युवासेना पदाधिकारी उपस्थित होते.




Post a Comment

0 Comments