Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

विश्व हिंदू परिषद तर्फे सोमवारी रक्तदान शिबिराचे आयोजन;मराठवाडा हायस्कूल मध्ये शिबिर होणार





परभणी ➡️ संपूर्ण देशभर विहिंप तर्फे शहीद कोठारी बंधू हुतात्मा दिनानिमित्त दि. 01 ते 07 नोव्हेबर हा आठवडा रक्तदान आठवडा म्हणून राबवला जातो. त्या अनुशंगाने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी शहीद कोठारी बंधू हुतात्मा दिनानिमित्त विश्व हिंदू परिषद व बजरंग दल परभणी याच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. 



शिबिर दि. 01 नोव्हेबर सोमवार रोजी वेळ सकाळी 10 ते दुपारी 02 या वेळेत मराठवाडा हायस्कूल शिवाजी नगर परभणी या ठिकाणी संपन्न होणार आहे. सर्वानी या रक्तदान कार्यक्रमात जास्तीत जास्त संख्येने सहभागी होवून रक्तदान करावे, असे आवाहन परभणी विश्व हिंदू परिषद व बजरंग दल परभणी यांच्या वतीने सुरेंद्र शहाणे (जिल्हाध्यक्ष) प्रल्हादराव कानडे (जि.कार्याध्यक्ष) सुनील रामपुरकर ( जिल्हा मंत्री ) राजकुमारजी भांबरे ( जिल्हा सहमंत्री ) प्रसाद कुलकर्णी, मनीष देशपांडे, रामप्रसाद तिडके , शुभम हाके ,बापूराव सूर्यवंशी, तुकाराम दैठणकर यांनी केले आहे.




Post a Comment

0 Comments