Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

लसीकरण जनजागृतीसाठी आयुक्त,मौलवी स्वत: फिरले घरोघरी




 




परभणी ➡️ परभणी शहरात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची गती वाढवण्यासाठी आणि गैरसमज दुर करण्यासाठी महापालीकेच्यावतीने आज जनजागृती केली जात आहे.


आता स्वत:आयुक्त देविदास पवार व मौलाना मुफ्ती हे देखील थेट घरोघरी,बाजारपेठत जाऊन नागरीकांना लसीकरण करुन घेण्याचे आवाहन करत आहेत. आयुक्त पवार व मौलाना मुफ्ती यांनी गुरुवारी (दि.30) शहरातील प्रभाग क्र 05 मधील मगदूमपुरा भागात जात नागरीकांना लस घेण्याविषयी जनजागृती केली.


त्यांनी व्यापारी, विक्रेते, नागरीक यांच्याशी संवाद साधत लसीकरणाविषयी माहीती दिली.कोरोनापासून दुर राहण्यासाठी लसीकरण किती महत्वाचे आहे हे पटवुन दिले. त्यामुळे नागरीकांनी लसीकरणासाठी प्रतिसाद देणे सुरु केले आहे. 


आयुक्त व मौलवींच्या आव्हानानंतर अनेकांनी ताक्ताळ लस घेतली.त्यांच्यासोबत नगरसेवक सचिन देशमुख,मनपा आरोग्य अधिकारी डॉ.कल्पना सावंत मोहम्द शेख,इफ्तीयार खान पठाण,आदी उपस्थित होते.




Post a Comment

0 Comments