Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला गोर - सेनेचा आक्रोश मोर्चा, तिन्ही आरोपींना द्या फाशी  






परभणी ➡️ सोनपेठ तालुक्यातील मौजे डिघोळ तांडा येथील अल्पवयीन मुलीवर सामुहिक अत्याचार करून तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या आरोपींना कठोर शिक्षा करावी या प्रमुख मागणीसाठी गोरसेनेच्या वतीने आज गुरुवारी (दि.30) दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला. 






प्रथम आज वसमत रस्त्यावर वसंतराव नाईक यांच्या पुतळ्यास अभिवादन करून तिथे एकत्र आलेल्या बंजारा समाजबांधवांनी घोषणा देत रॅली काढली. यावेळी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ मैदानात सर्व आंदोलकांनी ठिय्या मांडला. मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासनास देण्यात आले. 


यावेळी गोरसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संदेश चव्हाण, चंद्रकांत राठोड यांच्यासह इतर पदाधिकारी यांचे शिष्टमंडळ उपस्थित होते. सामुहिक अत्याचार प्रकरणातील तीनही नराधमांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, तसेच हे प्रकरण फास्टट्रॅक कोर्टामध्ये चालवावे, या प्रकरणावर पीडित कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी द्यावी तसेच 20 लाख रुपयाचे अनुदान तात्काळ मंजूर करण्यात यावे यासह आदी मागण्यासाठी गुरुवारी हे आंदोलन करण्यात आले. 



गोरसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.संदेश चव्हाण व प्रा.संपत चव्हाण, गोर - सेनेचे जिल्हाध्यक्ष अंकुश पवार यांच्या नेतृत्वाखाली आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मराठवाड्यातील विविध जिल्ह्यातून विविध संघटनेचे पदाधिकारी, नेते, आजी - माजी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, नगरसेवक विविध सामाजिक संघटना यांनी स्वयंस्फूर्तपणे सहभाग नोंदवला.




Post a Comment

0 Comments