Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

लाकुड माफियांची पत्रकाराला मारहाण, पत्रकारांची पोलीस अधिक्षकांकडे हद्दपारीची मागणी




 



परभणी ➡️ येथील एका वृत्तवाहिनीच्या संपादकास दि.27 सप्टेंबर रोजी सायंकाळच्या सुमार लाकुड माफियांनी मारहाण केली. प्रकरण इथेच थांबले नाही तर त्यानंतरही जिल्हाधिकारी कार्यालयात लाकूड माफियांकडून धमकावण्यात आले. या प्रकरणी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लाकुड माफियांवर कडक कारवाई करीत त्यांना हद्दपार करावे अशी मागणी परभणी जिल्हा मराठी पत्रकार संघाच्यावतीने पोलीस अधिक्षकांकडे करण्यात आली आहे.


 येथील पत्रकार सय्यद अखील सय्यद इस्माईल यास लाकुड माफिया शेख नदीम शेख नबी, शेख उस्मान शेख कासीम, शेख शब्बीर शेख कासीम रा.इटलापुर मोहल्ला या तिघांनी संगनमत करून अखील यास तु वन विभागास माहिती का देतो या कारणावरून दि. 27 सप्टेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास थापड बुक्क्यांनी मारहाण केली. या प्रकारानंतर या तिघांच्या विरोधा कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेच्या पाठोपाठ 29 सप्टेंबर रोजी दुपारी 4.30च्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात या तिन आरोपींपैकी शेख उस्मान शेख कासीम याने परत आमच्याविरूद्ध गुन्हा दाखल का केला, पोलीस आमच्या खिशात आहेत, पोलीस आमचे काही करू शकत नाही असे म्हणून धमकावले. 



या प्रकरणी पोलीस अधिक्षक यांना पत्रकाराच्या शिष्टमंडळांनी भेट घेऊन लाकुड माफीयांना हद्दपार करण्याची मागणी पत्रकारांच्या वतीने करण्यात आली. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून शहरासह जिल्हा भरात मोठ्या प्रमाणात अवैध वृक्ष तोड आणि झाडांच्या कत्तली मोठ्या प्रमाणात सुरू आहे. याला वन विभागाच्या अधिकार्‍यांचाही आशिर्वाद असल्याशिवाय हा प्रकार होत नाही. यामुळे लाकुड माफियांची दादागिरी दिवसेंदिवस वाढत आहे. यापुर्वीच या लाकुड माफियांवर विविध पोलीस ठाण्यांतर्गत गुन्हे दाखल झालेले आहेत. 


असे असतानाही हे लाकुड माफिया मोकाट फिरत असून वृक्षतोडीचे प्रमाण ही वाढते आहे. पोलीस अधिक्षकांना देण्यात आलेल्या निवेदनावर सुरेश कदम, सुरेश नाईकवाडे, शेख इफ्तेेखार, राजकुमार हट्टेकर, प्रविण चौधरी, प्रविण देशपांडे, लक्ष्मण मानोलीकर, शेख इस्माईल, किशन इक्कर, राहुल धबाले, राजु कर्डीले, बाळासाहेब घिके, सुधाकर श्रीखंडे, दिलीप बनकर, शेख महेबुब, संजय घनसावंत, बाबोरोद्दीन सिद्दीखी, मो.तनवीर, धाराजी भुसारे आदींची उपस्थिती होती.




Post a Comment

0 Comments