Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे आरडीसींच्या कक्षातच ठिय्या आंदोलन 




परभणी ➡️ संपूर्ण जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करुन हेक्टरी 50 हजार रुपयांची आर्थिक मदत करावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या संतप्त कार्यकर्त्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या कक्षातच गुरुवारी दुपारी ठिय्या आंदोलन करीत रोष व्यक्त केला. 


या निवेदनात जिल्ह्यातील शेतक-यांची पिके उध्दवस्त झाली आहे. अश्या परिस्थीत शेतक-यांच्या पाठिशी सरकारने व जिल्हा प्रशासनाने उभे राहिले पाहिजे परंतु दुर्दैवाने असे होतांना दिसत नाही. विशेष वेळोवेळी शेतकरी स्वाभिमानी संघटनाने यावर निवेदने रास्ता रोको आंदोलने करुन देखील सरकारने व जिल्हा प्रशासनाने याची काहीही दखल घेतलेली नाही आमच्या खालील प्रमाणे मागण्या आहेत.



1. जिल्हयात झालेल्या अतिवृष्टी मुळे झालेले शेतक-यांचे नुकसान यात पंचनाम्याचे घोळ न घालता सदर सगट शेतक-यांना हेक्टरी 50,000/- हजार रुपयांची मदत दया, 

2. ज्या शेतक-यांच्या जमिनी पुराच्या पाण्याने वाहुन गेल्यात त्या शेतक-यांची वेगळी वर्गवारी करुन त्यांना तात्काळ मदत करा. 

3. गाव गाडयातील ज्या लोकांचे घरे पडली आहेत त्यांना तात्काळ मदत करुन घरकुल मंजुर करावे.

 4. ज्या शेतक-यांचे पुराच्या पाण्याचे पशुधन वाहुन गेले किंवा मृत झाले त्यांना तात्काळ मदत दयावी 

5. ई-पिक पाहाणी जाचक अट तात्काळ रद्द करण्यात याव्यात. 

 


तसेच वरील मागण्या 8 दिवसांत मान्य न झाल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटना गावोगावी मुख्यमंत्र्याचे पुतळे ग्रामपंचायत कार्यालयासमोर जाळणार, अशी चेतावणी देण्यात आली. या निवेदनावर  संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर ढगे, दिगांबर पवार, गजानन तुरे, शेषराव शेळके, मुंजाभाऊ लोढे, रामप्रसाद गमे, बाळासाहेब घाटूळ, कृष्णा शिंदे, विशाल शेरे, किरण गरुड, माऊली लोढे, रामजी गरुड, अंकुश शिंदे, श्रीनिवास सूर्यवंशी, काशिनाथ गरुड, काशिनाथ शिंदे आदीचे  स्वाक्षरी आहे.


 




Post a Comment

0 Comments