Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

स्वच्छ भारत मिशन ग्रामीण जिल्हा परिषद परभणी स्वच्छता हेच अमृत आहे - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रतिपादन 







परभणी ➡️ ज्याप्रमाणे अमृत पिल्यावर व्यक्ती अमर होते असे म्हटले जाते अगदी त्याप्रमाणे आजच्या काळात जर आपण वैयक्तिक, कौटुंबिक, घर, वाडी, वस्ती अशा ठिकाणांची स्वच्छता ठेवली तर रोगराई नाहीशी होऊन आपोआप आरोग्यमान उंचावेल म्हणून स्वच्छता हेच अमृत असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. 


 दिनांक 30 सप्टेंबर 2021 रोजी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील सर्व ग्रामपंचायतीच्या सरपंच यांच्या स्वच्छते विषयी ऑनलाईन पद्धतीने संवाद कार्यक्रमाचे आयोजन शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी आपण ज्या प्रमाणे एकजूट दाखवत कोरोनावर नियंत्रण मिळवू शकलो. अगदी त्याप्रमाणे स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी कार्यक्रमानिमित्त राज्यातील सर्व सरपंच मंडळी आणि लोकप्रतिनिधींनी गावाच्या स्वच्छतेसाठी आणि शुद्ध पाण्यासाठी एकत्र येऊन गावाचा विकास करण्याचे आवाहन यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. 


यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील निवडक जिल्ह्यातील सरपंच मंडळीशी प्रत्यक्ष संवाद देखील साधला. याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे अपर मुख्य सचिव संजय चहांदे यांनी केले ते म्हणाले की, गावातील पाणीपुरवठा व स्वच्छता समितीचे अध्यक्ष सर्व सरपंच आहेत. त्यामुळे गावाच्या विकासासाठी सरपंच मंडळींनी पुढाकार घ्यावा येणाऱ्या काळात विविध योजना राबविण्यासाठी निधी कमी पडू देणार नसल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.




 ऑनलाईन संवाद कार्यक्रमात पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी मार्गदर्शन केले ते म्हणाले की, स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी कार्यक्रमानिमित्त राज्यभर शोष खड्डा तयार करणे, स्वच्छता मोहीम राबवणे, प्रत्येक नागरिकांना स्वच्छ व शुद्ध पाणी देणे, जल जीवन मिशन अंतर्गत ग्रामपंचायतीचे आराखडे तयार करणे, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, गोबर्धन, असे विविध उपक्रम राज्यभर सुरू आहेत. 



तेव्हा राज्यातील सर्व सरपंच मंडळींनी गावाला स्वच्छ आणि शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन यावेळी आमदार गुलाबराव पाटील यांनी केले. यावेळी सदर संवाद कार्यक्रमासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे, स्वच्छ भारत मिशन सर्व मुख्य कार्यकारी राजेंद्र तुबाकले यांच्यासह सरपंच मंडळींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.




Post a Comment

0 Comments