Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

समाज घडवण्यात शैक्षणिक संस्थांची मोठी जबाबदारी - सौ भावनाताई नखाते





परभणी ➡️ गरजू लोकांना मदत करणे हाच खरा धर्म आहे व त्यातच खरा आनंद आहे. कोविड काळामध्ये समाजाचे मनोधैर्य उंचावण्याचे काम आरोग्य विभागाने केले आहे. त्या सर्वांचे आपण अभिनंदन केले पाहिजे तसेच कोविडं च्या कठीण काळामध्ये अनेक सामाजिक संस्थांनी समाजाला सावरण्याचे काम केले आहे आपला समाज सुसंस्कृत करण्यासाठी व समाज घडवण्यासाठी शैक्षणिक संस्थांनी जबाबदारी घेतली पाहिजे असे अवाहन सौ.भावनाताई नखाते यांनी केले.


दिनांक 30 सप्टेंबर 2021 रोजी वाल्मिकी शिक्षण प्रसारक मंडळ परभणी संचलित शांताबाई नखाते विद्यालय पाथरी येथे मेडिकल क्षेत्रात यश संपादन केलेले व राष्ट्रीय आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी आयोजित शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा गुण गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता.


या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सौ.भावनाताई नखाते अध्यक्षा परभणी जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रमुख पाहुणे म्हणून मुकेश राठोड गटशिक्षण अधिकारी पंचायत समिती पाथरी, प्रमिला पोरवाल, अनिता प्रसाद पोरवाल,भगवान पाटील, कविता शिंदे, मुख्याध्यापक यादव एन.इ. तसेच सत्कारमूर्ती डॉ. प्रणव पोरवाल (एम.बी.बी.एस. एम.डी) व शिष्यवृत्ती धारक विध्यार्थी कु.चैत्राली नवघरे कु.सायली पाटील चि. कुणाल शिंदे आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्थाविक मुख्याध्यापक डहाळे के.एन. यांनी केले.


डॉ. पोरवाल यांनी आपल्या मनोगतातून उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन केले मुकेश राठोड यांनी राष्ट्रीय स्तरावर आयोजित परीक्षेत जास्तीत जास्त विध्यार्थ्यांने सहभाग नोंदवावा असे आव्हान केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तुकाराम शेळके तर प्रफुल्ल बोथीकर यांनी आभार प्रदर्शन केले. 





Post a Comment

0 Comments