Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

मनपा आयुक्त स्वत: दिव्यांगाच्या घरी लसीकरणासाठी हजर





परभणी ➡️ शहरातील विद्या नगर येथील दिव्यांग अजिंक्य कुलकर्णी यांच्या घरी जाऊन सोमवारी (दि.30) महानगरपालिकेच्या वतीने लसीकरण करण्यात आले. या प्रसंगी महानगरपालिकेचे आयुक्त देविदास पवार हे देखील उपस्थित होते.

 

आज मनपा जायकवाडी रुग्णालय कल्याण मंडपम जवळ दिव्यांग बांधवांसाठी शिबिराचे आयोजन

उद्या दिनांक 31 ऑगस्ट रोजी परभणी शहर महानगरपालिका तर्फे दिव्यांग बांधवां करिता मनपा जायकवाडी रुग्णालय कल्याण मंडपम जवळ येथे विशेष लसीकरण शिबिर आयोजित करण्यात आले आहे तरी दिव्यांग बांधवानी या शिबिराचा लाभ घेऊन कोविड -19 लसीकरण करावे.

 

महानगरपालीकेच्यावतीने कोराना प्रतिबंधक लसीकरण सुरु आहे.ज्या नागरीकांना लसीकरण केंद्रावर येणे शक्य नाही अशा दिव्यांग,व्याधीग्रस्त नागरीकांना देखील लस मिळाली पाहीजे यासाठी महानगर पालीकेने पुढाकार घेत थेट घरोघरी जाऊन लस देण्यास सुरुवात केली आहे. सोमवारी आयुक्त पवार यांनी आरोग्य पथकासह कुलकर्णी यांच्या घरी जात त्यांना लस दिली.


यावेळी डॉ.कल्पना सावंत, माजी नगरसेवक नवनीत पाचपोर, आरोग्य सेविका जी आर ठाकूर , सहाय्यक रिजवान शेख , मोहम्मद जावेद, किरण ठाकरे, नोडल अधिकारी सय्यद ईरफान,महेन्द्र फुटाणे आदी उपस्थीत होते. ज्या घरात वयोवृध्द,दिव्यांग व्यक्ती आहेत.त्यांच्या कुटूंबाने आपल्या जवळच्या महापालीकेच्या नागरी आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा असे आवाहन आयुक्त पवार यांनी केले आहे..




Post a Comment

0 Comments