Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

नानलपेठवासीयांचा जोरदार रास्तारोको; आमदार सुरेश वरपुडकर यांनी दिले नोव्हेंबरमध्ये रस्त्याचे काम करण्याचे आश्वासन 




परभणी ➡️ मध्यवस्तीतील नानलपेठ ते जेल कॉर्नर या रस्त्याच्या भयावह अवस्थेच्या विरोधात नानलपेठ भागातील संतप्त नागरीकांनी महानगरपालिकेच्या विरोधात सोमवारी दूपारी जोरदार रस्तारोको आंदोलन केले.त्याद्वारे तीव्र संताप व्यक्त केला दरम्यान या या आंदोलन करताना ज्येष्ठ नेते आमदार सुरेश वरपुडकर, उपमहापौर भगवान वाघमारे यांनी नोव्हेंबर महिन्यात संपूर्ण रस्त्याचे काम करून देऊ असे ठोस आश्वासन दिले आहे. 



साने चौकापासून ते शनिवार बाजार तेथून पुढे आंध्रा बँक कॉर्नरपासून ते जेल कॉर्नर पर्यंतच्या रस्त्यावर छोट्या मोठ्या आकाराचे हजारो खड्डे आहेत. या रस्त्याची अक्षरशः चाळणी झाली आहे. पावसाळ्यात या खड्ड्यांमधून पाणी साचत आहे. तर उन्हाळा अन् हिवाळ्या धूळ जमा होत आहे. त्यामुळे या खड्डेमय रस्त्यामुळे या भागातील नागरीकांना तसेच अन्य वाहनधारकांना आदळ आपट करीत वाहन चालविल्याशिवाय पर्याय नाही, असे चित्र आहे. या खड्ड्यांमुळे अबालवृध्द, महिला, मुलांना नाहक त्रास सहन करावा लागतो आहे. मानेचा, कमरेचा त्रास सुरु आहे. 


या खड्ड्यांमुळे छोट्या-मोठ्या अपघाताच्या घटना दररोजच्या झाल्या आहेत. खड्ड्यांमुळे दोन विद्यार्थी व एका पोलिस अधिकार्‍याचा मृत्यू झाला. परंतु, महापालिका प्रशासनास या घटना होवूनसुध्दा जाग आली नाही, अशी खंत नानलपेठ भागातील रहिवाशी दिलीप माने, सतीश कहात, प्रविण कहात, कदीर खान, अजय कुलथे, वैभव तरडे, विराज कदम, अनिल कुरकुटे, लक्ष्मणराव सराफ, दीपकराव उन्हाळे, ज्ञानेश्‍वर इक्कर, रामसिंग ठाकूर, गजानन बोरसे, पंकज सुगंधे आदी नागरीकांनी महापालिका आयुक्तांना सादर केलेल्या निवेदनातून व्यक्त केली होती.


या भागात पोलिस मुख्यालय, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य कार्यालय, जिल्हा कारागृह, जिल्हा शासकीय रुग्णालय, तीन ते चार शाळा आदी महत्वपूर्ण प्रतिष्ठाने कार्यरत आहेत. असे असतांनासुध्दा रस्त्याची डागडुजीसुध्दा केली जात नाही. गेल्यावर्षी काही ठिकाणी डागडुजी करण्यात आली. तीसुध्दा थातूरमातूर ठरली. रस्ता पून्हा जैसे थे अवस्थेत आला, अशी खंत पत्रकार दिलीप माने यांनी व्यक्त केली होती.




Post a Comment

0 Comments