Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

परभणी येथील दर्गाह व्यवस्थापनासह जमीनीचा ताबा वक्फ मंडळाकडे सुपूर्द




 

परभणी ➡️ येथील वक्फ संस्था दर्गाह बुर्‍हान शाह वलीच्या व्यवस्थापनाचा तसेच वक्फ मिळकत सर्वे नं. 636 व 637 च्या जमीनीचा उपविभागीय महसूल प्रशासनाने वक्फ मंडळास ताबा दिला. राज्य वक्फ मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांच्या 28 जुलै रोजीच्या पत्रानुसार तसेच महाराष्ट्र शासन राजपत्रातील अधिसूचनेनुसार वक्फ अधिनियम 1995 चे कलम 65 अन्वये सदरील प्रकरणे जिल्हा वक्फ अधिकारी यांनी कोणतीही आवश्यक कारवाई न केल्यामुळे सदरील वक्फ संस्थेचा ताबा जिल्हा वक्फ अधिकारी यांना मिळाला नाही. 


त्या अनुषंगाने वक्फ संस्था दर्गा बुर्‍हान शाह वलीच्या व्यवस्थापनाचा तसेच मिळकत सर्वे नं. 636 व 637 चा वक्फ संस्थेचा ताबा घेणेकामी उपविभागीय अधिकारी यांना जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी प्राधीकृत अधिकारी म्हणून नियुक्त केले होते. या प्रकरणात ताबा घेणेकामी तात्काळ आवश्यक ती कारवाई पूर्ण करावी, असे आदेशही जिल्हाधिकारी गोयल यांनी दिले होते. 



त्याप्रमाणे उपविभागीय अधिकारी संजय कुंडेटकर यांनी सोमवारी (दि.30) राज्य वक्फ मंडळातर्फे प्राधिकृत अधिकारी म्हणून जिल्हा वक्फ अधिकारी व प्रादेशिक वक्फ अधिकारी पुणे यांना म्हणजे प्रभारी जिल्हा वक्फ अधिकारी मोहम्मद रियाजोद्दीन व प्रादेशिक वक्फ अधिकारी खुसरो खान यांना सोमवारी दोन साक्षीदारांसह एकतर्फी ताबा दिला.




Post a Comment

0 Comments