Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

लालबावटा शेतमजुर युनियनचे परभणीत घरकुलाच्या हक्कासाठी बेमुदत धरणे आंदोलन




परभणी ➡️ प्रधानमंत्री आवास योजना व अन्य शासकीय योजनांतर्गत शासकीय यंत्रणेद्वारा लाभार्थ्यांची चालविलेली फसवणूक व अन्य समस्यांबाबत ग्रामीण मजुरींनी लालबावटा शेतमजुर युनियन जिल्हा कौन्सिलचे महाराष्ट्र कार्याध्यक्ष कॉम्रेड राजन क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी (दि.30) परभणी जिल्ह्यातील जनतेच्या घरकुलाच्या हक्कासाठी बेमुदत धरणे आंदोलन सुरु केले. 




या आंदोलनात संपूर्ण जिल्ह्यातून आलेले ग्रामीण मजूर, शेतकरी, मच्छिमार मोठ्या संख्येने सहभागी झाले. याबाबत जिल्हाधिकारी तथा प्रधानमंत्री आवास योजना अध्यक्ष परभणी यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. ग्रामीण मजूर, शेतकरी व मच्छिमार कुटूंबास पंतप्रधान आवास योजना/इंदिरा आवास योजना/रमाई निवारा योजना/राजीव गांधी निवारा योजना/ मच्छिमार घरकुल योजना/शबरी योजना व पंडित दिनदयाल उपाध्याय घरकुल जागा खरेदी योजना अन्य निवारा/ घरकुल योजनेतून घरकुल व निवारा आणि घरकुलासाठी जागा मिळवून देण्याची मागणी करण्यात आली आहे. 


निवेदनात म्हटले आहे की, अर्जदार हे व्यवसायाने ग्रामीण मजूर/शेतकरी/मच्छिमार असून त्यांच्या कुटुंबाला राहण्यासाठी पुरेसा व चांगला निवारा उपलब्ध नाही. मोलमजुरीमधून घर व घरासाठी जागा विकत घेणे शक्य नाही. भारत सरकारने पुरेसा व चांगला निवारा हा प्रत्येक नागरिकाचा हक्क मानणारी युनोद्वारा जाहिर केलेली सनद मंजूर केली आहे. 2022 सालापर्यंत सर्वांना निवारा असे धोरण देखील जाहीर केले आहे. त्यानुसार विविध योजना देखील घोषित केल्या आहेत.


तथापि त्यांच्या कुटूंबाला आजवर कोणत्याही घरकुल व निवारा योजनेचा लाभ मिळाला नाही. पंतप्रधान आवास योजना/इंदिरा आवास योजना/ रमाई निवारा योजना/राजीव गांधी निवारा योजना/पंडित दिनदयाल उपाध्याय घरकुल जागा खरेदी योजना व अन्य निवारा/घरकुल योजनेत समाविष्ट करुन घेण्यात यावे. 


त्यांच्या कुटूंबाला पंतप्रधान आवास योजना/इंदिरा आवास योजना/ कमाई निवारा योजना/या व अन्य निवारा योजनेतून घरकुल व निवारा मिळवून द्यावा. तसेच त्यांच्या कुटूंबाला पंडित दिनदयाल उपाध्याय घरकुल जागा खरेदी योजना अंतर्गत घरकुलासाठी जमीन उपलब्ध करुन द्यावी, अशी मागणी करीत हे कष्टकरी, शेतमजूर निवारा हक्क आंदोलनात सहभागी झाले. 


या आंदोलनात कॉ.राजन क्षीरसागर यांच्यासह आसाराम जाधव, प्रकाश गोरे, नवनाथ कोल्हे, ज्ञानेश्वर काळे, शेख अब्दुल, अँड.लक्ष्मण काळे, आसाराम बुधवंत, दिलीप राठोड, लक्ष्मण घोगरे, गणेश गाडेकर, अरुण हारकळ, सय्यद इब्राहीम, श्रीनिवास वाकणकर, अनिल पंडित, ओंकार पवार, वामन ढोबळे, अंगद भोरे, अनिस शेख, दिलीप राठोड, गजानन देशमुख, आप्पा कुराडे, चाँद खॉ, मुरली पायघन, शंकर पालकर, संविधान गायकवाड, तुकाराम शिंदे, चंद्रकांत जाधव आदी सहभागी होते.




Post a Comment

0 Comments