Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

स्वाभिमानी संघटनेतर्फे पीक कर्जासाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेत ठिय्या आंदोलन 






परभणी ➡️ स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत तोंड पाहून पीक कर्जवाटप होत असल्या प्रकरणी आणि पीक कर्जासाठी बँक जाचक अटी लावत असल्या कारणाने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आज सोमवार दि. 30 ऑगस्ट रोजी घेराव घालून ठिय्या आंदोलन केले.  येत्या गुरुवार पर्यन्त मागणी केलेल्या शेतकऱ्यांना कर्ज वाटप नाही झाल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटना लावणार बँकेला कुलूप.



🙇‍♂️🙇‍♀️🙇🙇‍♂️🙇‍♀️🙇🙇‍♂️🙇‍♀️🙇🙇‍♂️🙇‍♀️🙇🙇‍♂️🙇‍♀️🙇🙇‍♂️🙇🙇🙇‍♂️🙇‍♀️🙇
🙇‍♂️🙇‍♀️🙇🙇‍♂️🙇‍♀️🙇🙇‍♂️🙇‍♀️🙇🙇‍♂️🙇‍♀️🙇🙇‍♂️🙇‍♀️🙇🙇‍♂️🙇🙇🙇‍♂️🙇‍♀️🙇



आज दिलेल्या निवेदनात रोजी आपल्या कार्यालयात ठिय्या आंदोलन करून पुढील बाबींवर लक्ष वेधत आहोत. 1 ) तुटपुंजे - कमीप्रमाणात कर्ज वाटप न करता, फायनान्स स्केल प्रमाणात वाटप करण्यात यावे. 2 ) झालेले कर्ज वाटप हे लगे - बांधे, संचालक शिफारसीने होत असून, तसे करण्यात येऊ नये. 3 ) ईतर बँकांचे बोजा असलेल्या 7 / 12 नाकारण्यात येऊ नयेत. 4 ) कर्ज माफीतील पात्र शेतकरी यांना प्राधान्याने कर्ज पुरवठा करण्यात यावा. 5 ) बऱ्याच शेतकऱ्यांनी पदरमोड करून कर्ज रक्कम भरलेली असूनही त्यांना कर्ज पुरवठा करण्यास टाळाटाळ होत आहे, तसे होऊ नये. 



वरील बाबींवर लक्ष देऊन त्यांची तात्काळ पूर्तता करण्यात यावी. अन्यथा स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या वतीने पुढील आंदोलन तीव्र पद्धतीने करण्यात येईल, याची नोंद घ्यावी. यावेळी किशोर ढगे, भास्कर खटिंग, गजानन तुरे, केशव आरमळ, दिगंबर पवार, प्रसाद गरुड, रामप्रसाद गमे, जयवंत कुंडगिर, काशिनाथ शिंदे, विठ्ठल चोखट, दत्ता परांडे, अंजनराव मुंढे, गोपाळ लोंढे, राम चोखट, रघुनाथ चिलगर, कल्याण चोखट आदींची उपस्थिती होती.



Post a Comment

0 Comments