Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी बुधवारपासून धरणे आंदोलन होणार सुरू




परभणीकर होंगे कामयाब एक दिन.....

परभणी ➡️  येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करावे या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आता दि. 01 सप्टेंबर बुधवारपासून परभणीकर धरणे आंदोलन करणार आहेत. परभणीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करावे म्हणून परभणीचे खासदार संजय (बंडू) जाधव यांच्या नेतृत्वाखाली गेल्या काही वर्षांपासून जिल्ह्यात सर्वपक्षीय लढा सुरू आहे. 




आतापर्यंत परभणीकरांनी दि. 21 ते 31 ऑगस्ट दरम्यान स्वाक्षरी मोहीम राबविली जात असून या मोहिमेला जिल्हाभरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. दि. 29 ऑगस्ट रोजी परभणीत सर्वपक्षीय बैठक पार पडली. या बैठकीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची लढाई अधिक तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. 


 

दि. 01 ते 07 सप्टेंबर दरम्यान परभणी येथील जिल्हाधिकारी कचेरीसमोर व्यापक प्रमाणात धरणे आंदोलन करण्यात येणार आहे

♦️01 सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील युवक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार आहेत.

♦️02 सप्टेंबर रोजी युवती- महिला धरणे आंदोलनात सहभागी होणार आहेत. 

♦️03 सप्टेंबर रोजी टाळ- मृदंगाचा नाद घुमणार असून वारकरी, माळकरी प्रवचनकार, कीर्तनकार कलावंत, लोककलावंत, खेळाडू, क्रीडा संघटक, क्रीडा मार्गदर्शक हे आगळ्या- वेगळ्या धरणे आंदोलनासाठी एकवटणार आहेत.


♦️04 सप्टेंबर रोजी व्यापारी, शिक्षक, प्राध्यापक, मुख्याध्यापक, प्राचार्य, वकील, डॉक्टर्स, इंजिनिअर्स, गुत्तेदार, कर्मचारी धरणे आंदोलनात उतरणार आहेत. 

♦️05 सप्टेंबर हा धरणे आंदोलनाचा शेवटचा दिवस असून या दिवशी शेतकरी, शेतमजूर, कामगार, हमाल, मापाडी ऑटोचालक, इतर वाहनधारक धरणे आंदोलन करणार आहेत. 

♦️07 सप्टेंबरपासून खा. संजय जाधव हे स्वत: आमरण उपोषण करणार आहेत. तरी धरणे आंदोलनात परभणीकरांनी एकजुटीने व मोठ्या संख्येने सहभागी होऊन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची अस्मितेची लढाई यशस्वी करावी, असे आवाहन आम्ही परभणीकरांच्या वतीने करण्यात आले आहे.




Post a Comment

0 Comments