Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

सेलु येथे भिमप्रहार संघटनेच्या शाखा नामफलकाचे अनावरन





सेलू
➡️  येथील आठवडी बाजारात भिमप्रहार च्या शाखा नामफलकाचे अनावरण सामाजिक कार्यकर्ते महमूद भाई, नगरसेवक शेख रहीम, नगरसेवक अजिम कादरी यांच्या हस्ते करण्यात आले. भिमप्रहार संघटना ही स्वाभिमानी व प्रामाणिक युवकांची संघटना असुन आज दि. 29/8/2021 रविवार रोजी सेलु येथील आठवडी बाजारात भिमप्रहारच्या शाखा नामफलकाचे अनावरण सामाजिक कार्यकर्ते महमूद भाई, नगरसेवक शेख रहीम, नगरसेवक अजिम कादरी यांच्या हस्ते करण्यात आले. 


या प्रसंगी भिमप्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.प्रविण कनकुटे, जिल्हाध्यक्ष विश्वजीत वाघमारे, जिल्हा महासचिव ॲड. विष्णु ढोले यांची प्रमुख उपस्थीती होती. सेलु शहरामध्ये सामाजिक परिवर्तन करण्यासाठी भिमप्रहार व युथ फोरम दलित मुस्लीम एकतेचे नविन पर्याय देईल असे मत प्रा.डॉ.प्रविण कनकुटे यानी व्यक्त केले. आजच्या कार्यक्रमाचे आयोजन भिमप्रहार चे तालुकाध्यक्ष बापु धापसे, शहराध्यक्ष राहुल जाधव, अर्जुन बावीसे, राजीक कुरेशी यानी केले होते. 


या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित श्याम गवारे, राजाभाऊ ढगे, आदित्य काळे, सिध्दार्थ वाघमारे, सुनिल शिंदे, करीम खान, शेख साजित, मुखीद शेख, विकास खरात यांची उपस्थीती होती. शाखा कार्यकारीणीमध्ये माजित सय्यद, शोयब खतीब, पठाण ईम्रान, शेख इरफान, विशाल वाकळे, सय्यद वसीम, साहेब शेख, अरबाज शेख, शेख साजेद, अशोक मुस्लीम, आकाश अंभोरे यांचा समावेश आहे.




Post a Comment

0 Comments