Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

पाथरी तालुक्‍यातील हादगाव बु.महसुल मंडळात ढगफुटी; शेतीसह घर, दुकानात पाणी शिरले




परभणी ➡️ पाथरी तालुक्‍यातील हादगाव बु सज्जामध्ये सोमवारी रात्रभर पाऊस पडला तर मंगळवारी ढगफुटी झाल्याने  घराघरात व दुकानात पाणी शिरल्याने संसारोपयोगी साहित्यासह, किराणा, कापड, सिमेंट यासह साहित्याचे नुकसान झाले. 


200 एकर जमिनीतील पिकांत पाणी शिरले आहे. दरम्यान नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश तहसीलदार कट्टे यांनी महसुल व कृषी यंत्रणेला दिले आहेत. तहसीलदार एस.बी. कट्टे व बाजार समितीचे सभापती अनिल नखाते यांनी ढगफुटीने झालेल्या नुकसानीची सकाळपासून पाहणी करत या भागात तळ ठोकून ग्रामस्थांना धीर दिला.


परभणी जिल्ह्यात मंगळवारी सकाळी 8 वाजेपर्यंत मागील 24 तासांत जिल्ह्यात एकूण सरासरी 39.7 मिमी पावसाची नोंद झाली आहे. परभणी तालुक्यात 35.2, गंगाखेड 34.4, पाथरीत 88.7, जिंतूर 17, पुर्णा 32.5, पालम 72.1, सेलू 44.2, सोनपेठ 19, मानवत 37.7 मिमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या काळात साधारणत: एकूण सरासरी 761.3 मिमी पाऊस पडतो. जिल्ह्यात 1 जूनपासून 31 ऑगस्टपर्यंत 717.8 मिमी पावसाची नोंद झालेली असूल हे प्रमाण वार्षिक सरासरीच्या 94.3 टक्के इतके आहे.


तालुक्‍यात सोमवारी रात्रभर पाऊस सुरू होता. त्यानंतर मंगळवारी पहाटे 4 वाजता मुसळधार पाऊस सुरु झाला. सकाळी 8.30 वाजेपर्यंत हादगाव महसुल मंडळात 130 मि.मी.एवढ्या पावसाची नोंद झाली आहे. ढगफुटीसदृश्य पाऊस झाल्याने हादगांव बु.गावाजवळील लेंडी नदीला मोठा पूर आला. विठोबा नदी व आत्तार नदी याचा संगम होत असल्याने सर्व पाण्यामुळे लेंडीनदीला महापुर आला. 


हे पाणी हादगांव बु.गावात शिरल्याने घरे, दुकान आणि शेत शिवारातील पिकांत 2 ते 3 फुट पाणी साचले. यामुळे घरातील संसारोपयोगी साहित्य, किराणा, कापड, सिमेंटसह व्यावसायिकांंचे मोठे नुकसान झाले आहे. तर काही व्यापार्‍यांचे लाकूड पुरात वाहून गेले. महसूल मंडळातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. हादगाव बु.सज्जामधील मंडळ अधिकारी सर्व तलाठी आणि कृषी विभागातील अधिनस्त कर्मचार्‍यांनी तातडीने नुकसानीचे सर्वेक्षण करून विनाविलंब अहवाल सादर करण्याचे आदेश तहसीलदार सुभाष कट्टे यांनी दिले आहेत.

 





Post a Comment

0 Comments