Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

सेलु न्यायालयात कायदेविषयक जनजागृती शिबीराचे आयोजन




 

सेलू ➡️ येथील तालुका विधी सेवा समिती सेलु व सेलु वकिल संघ यांचे संयुक्त विद्यमाने सेलु न्यायालयात आज कायदेविषयक जनजागृती शिबीराचे आयोजन करण्यात आले. 


यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष  एस. एम. चव्हाण दिवाणी न्यायाधिश सेलु तर प्रमुख पाहुणे म्हणुन एस.ए. पर्वतकर सह दिवाणी न्यायाधीश सेलु व ॲड सुनिता ढोले सेलु वकिल संघ उपाध्यक्ष हे होते. यावेळी विविध विषयांवर मार्गदर्शन करणेत आले. 


ॲड. पि.डी गिराम यांनी मोटार वाहन अधिनियम कायदा, ॲड. एम.एल चट्टे यांनी जेष्ठ नांगरीकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम तर ॲड. रुपाली भिसे यांनी पोटगिचा कायदा यावर मार्गदर्शन केले. सुत्रसंचालन ॲड महेश वाडेकर यांनी केले. 


तसेच ॲड. सुनिता ढोले व सहन्यायाधीश पर्वतकर यांनी आपले आपले मनोगत व्यक्त केले तर अध्यक्षिय समारोप दिवाणी न्यायाधिश एस.एम चव्हाण यांनी केला. यावेळी बहुसंख्य वकिल बांधव व पक्षकार ऊपस्थित होते.




Post a Comment

0 Comments