Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

सतीश नावाडे यांचा राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारा बद्दल सत्कार 




सेलू ➡️ येथील नूतन विद्यालयात हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांची जयंती क्रीडा दिनाचे औचित्य साधून प्रशालेतील क्रीडा शिक्षक सतीश नावाडे यांचा क्रीडा संस्कृती फाऊंडेशन नाशिकच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल सोमवार ( दि. 30 ) रोजी सत्कार करण्यात आला. 

या प्रसंगी प्रशालेचे मुख्याध्यापक नारायण सोळंके, उपमुख्याध्यापक संतोष पाटील,  पर्यवेक्षक किरण देशपांडे, निशा पाटील, ऊज्वला लड्डा , नंदकुमार बंगाळे, परसराम कपाटे, काशिनाथ पल्लेवाड, विशाल क्षिरसागर, अतुल पाटील यांची उपस्थिती होती. 


क्रीडा विभाग प्रमुख प्रशालेचे पर्यवेक्षक देविदास सोन्नेकर यांनी मेजर ध्यानचंद यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. ते म्हणाले की, ' प्रचंड राष्ट्रनिष्ठा असलेले मेजर ध्यानचंद हे देशासाठी खेळले आणि अगदी साधेपणाने देशासाठीच जगले.


त्यांचा आदर्श घेऊन हा दैदिप्यमान वारसा आणि वसा खेळाडूंनी पुढे न्यायला हवा. ' सुत्रसंचलन क्रीडा शिक्षक गणेश माळवे यांनी केले. तर आभार प्रदर्शन सांस्कृतिक सहविभाग प्रमुख सुरेश हिवाळे यांनी केले.




Post a Comment

0 Comments