Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाअध्यक्ष भुमरे यांच्या जीपवर अज्ञात लोकांनी केली दगडफेक 





परभणी ➡️ भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाअध्यक्ष सुरेश भुमरे यांच्या जीपवर  28 ऑगस्ट रोजी रात्री 10.45 वाजता नांदेडहून परभणीला वापस असताना कात्नेश्वर येते अज्ञात 03 ते 04 लोकांनी अंधारात लपून दगडफेक केली. यात कोणी जखमी झाले नाही. या संदर्भात आज 29 ऑगस्ट रोजी अज्ञात आरोपींच्या विरोधात पुर्णा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आली. 

या संदर्भात पुर्णा पोलिस ठाण्यात आज 29 ऑगस्ट रोजी दिलेल्या फिर्यादीत सांगण्यात आले कि सुरेश रामराव भुमरे (34)  व्यवसाय शेती रा. एकता नगर परभणी हे 28 ऑगस्ट रोजी जीपने (MH-22-U-5969) नांदेड येथे काही कामानिमित्त गेले होते. ते काम करून नांदेड -परभणी-झिरो मार्गे वापस येताना रात्री 10.45 वाजता कात्नेश्वरच्या जवळ आले असता अज्ञात 03 ते 04 लोकांनी अंधाराचा फायदा घेऊन दगडफेक केली. या जीपचे समोरील काच फुटून 10 हजार रुपयांचे नुकसान झाले. यावेळी जीपमध्ये चालक विजय बालासाहेब गिराम हे सोबत होते. या दगडफेकीत कोणी जखमी झाले नाही. या फिर्यादीवरून अज्ञात आरोपी विरोधात भारतीय दंड संहिता 336 व 427 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आले.

त्या संदर्भात आज पूर्णा पोलीस निरीक्षक सुभाषचंद्र मारकड यांना एस.पी. जयंत मीना यांनी दोषीवर कठोर कारवाई करण्यास व तात्काळ पंचनामा करून व एफ आर दाखल करण्याचे आदेश दिले आहे. यावेळी जिल्हा सरचिटणीस आकाश लोहट, विजयराव कराड, विनयजी कराड, देवानंद वळसे, विश्वनाथ होळकर विजय गिराम, गंगाधर डुकरे,नारायण बनसोडे, अंगद बनसोडे, माधव बनसोडे, धनराज बनसोडे, आनंद रणविर, केशव बनसोडे, आनंद बनसोडे, महेश गलांडे, दीपक राव शेंद्रे व युवा मोर्चाचे पदाधिकारी उपस्थित होते.


   






Post a Comment

0 Comments