Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

ईग्रामस्वराज- पीएफएमएस प्रणालीमध्ये परभणी जिल्हा महाराष्ट्रात अव्वल





परभणी ➡️ महाराष्ट्र शासनाने तयार केलेल्या ईग्रामस्वराज-पी एफ एम एस प्रणाली मध्ये परभणी जिल्ह्याने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांच्या नेतृत्वात केलेल्या कामगिरी मध्ये परभणी जिल्ह्याने महाराष्ट्रात अव्वल क्रमांक पटकावला आहे. 


ईग्रामस्वराज-PFMS प्रणाली द्वारे तिन्ही स्तरावर राज्यात प्रथम क्रमांक मिळणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था ह्या परभणी जिल्हा परिषद अंतर्गत आहेत ही खूप आनंदाची बाब आहे. जिल्हा परिषद परभणीचे तंत्रस्नेही उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) श्री ओमप्रकाश यादव व आपले सरकार सेवा केंद्र टीम यांचे सातत्यपूर्ण प्रयत्नामुळे हे शक्य झाले. 
शिवानंद टाकसाळे (भा.प्र. से.), 
मुख्य कार्यकारी अधिकारी, 
जिल्हा परिषद, परभणी. 


महाराष्ट्र राज्यातील ग्रामपंचायती, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदांना 15 व्या वित्त आयोगाचा प्राप्त निधी ईग्रामस्वराज-पीएफएमएस प्रणाली मधून ऑनलाईन पद्धतीने खर्च करावयाचा आहे. परभणी जिल्ह्याने ग्रामपंचायत पंचायत समिती व जिल्हा परिषद या तीनही स्तरावर राज्यात सर्वप्रथम आघाडी मिळवली आहे.



परभणी जिल्हा परिषदेने पीएफएमएस प्रणालीद्वारे देयक अदा करण्याचा राज्यात प्रथम बहुमान मिळवला याचा मनस्वी आनंद आहे. यासाठी ग्रामविकास विभागातील अधिकारी यांनी वेळोवेळी सहकार्य व मार्गदर्शन केले. सर्व संबंधितांचे प्रशिक्षण व तांत्रिक साहाय्य यामुळेच हे शक्य झाले. 
ओमप्रकाश मं यादव,
उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.प.),
 जिल्हा परिषद, परभणी.
 


राज्यातील 27 हजार 889 ग्रामपंचायती पैकी परभणी जिल्ह्यातील लोहगाव ग्रामपंचायत, राज्यातील 351 पंचायत समिती पैकी गंगाखेड पंचायत समिती आणि राज्यातील 34 जिल्हा परिषदा पैकी परभणी जिल्हा परिषद यांनी राज्यात सर्वप्रथम पहिल्यांदा ईग्रामस्वराज-पीएफएमएस प्रणाली द्वारे पेमेंट केले. 


सदरचे पेमेंट कसे करायचे याबाबतचे सादरीकरण परभणी जिल्हा परिषदेने तयार केले असून ते राज्यभरात उपयोगी ठरणार आहे. सदरची कामगिरी पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव यांच्या मार्गदर्शनातून आणि आपले सरकार सेवा केंद्राचे सर्व कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नातून पार पडली.







Post a Comment

0 Comments