Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

जिल्हा परिषद कन्या प्रशालेसमोरील अतिक्रमणे हटविण्यास सुरुवात    




परभणी ➡️ येथील स्टेशनरोड भागातील जिल्हा परिषद कन्या प्रशालेच्या संरक्षण भिंतीसमोर वर्षानुवर्षांपासून ठाण मांडलेल्या अतिक्रमणकर्त्यांना महापालिकेस शहर वाहतूक पोलिस यंत्रणेच्या अधिकार्‍यांनी शनिवारी (दि.28) हटविण्यास सुरुवात केली. 


वर्दळीचा भाग असणार्‍या या रस्त्यावरील कन्या प्रशालेच्या संरक्षण भिंती लगतच बेसुमार अतिक्रमणे विसावली आहेत. काहींनी अतिक्रमणे पक्की केली आहेत. या अतिक्रमणकर्त्यांच्या विरोधात आजपर्यंत एक-दोन वेळा कारवाया करण्यात आल्या. या पार्श्‍वभूमीवर शनिवारी दुपारी याच ठिकाणी पध्दतशीरपणे विसावलेल्या अतिक्रमणकर्त्यांना संयुक्त पथकाने हटविण्याचा प्रयत्न केला.


 




Post a Comment

0 Comments