Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी सर्वपक्षीय निर्णायक लढाईचा घेतला संकल्प 





परभणी ➡️ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परभणीत स्थापनेकरिता निर्णायक लढाई लढण्याचा संकल्प सर्वपक्षीय नेतेमंडळींनी रविवारी आयोजित केलेल्या एका बैठकीतून सोडला. आज येथील बी. रघुनाथ सभाग्रहात शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांनी बोलाविलेल्या सर्वपक्षीय बैठकीस शहरासह जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेतेमंडळी उपस्थित होती.


यावेळी ज्येष्ठ नेते आमदार सुरेश वरपुडकर,आमदार बाबाजानी दुर्रानी, माजी आमदार सुरेशदादा देशमुख, माजी महापौर प्रताप देशमुख, ज्येष्ठ नेते विजय वाकोडे, उपमहापौर भगवान वाघमारे,गटनेते माजूलाला, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विशाल कदम, अँड.अशोक सोनी प्रभाकर पाटील वाघीकर,राम नाना खराबे, अतुल सरोदे,रवी सोनकांबळे,स्वराजसिंह परीहार, राजन क्षीरसागर, किर्तीकुमार बुरांडे,जयश्री खोबे,भीमराव वायवळ, श्रीधरराव देशमुख, सचिन देशमुख, लियाकत अली अन्सारी,डॉक्टर सिद्धार्थ भालेराव, यांच्यासह विविध क्षेत्रातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पूज्य भंत्ते उपगुप्त महाथेरो हे अध्यक्षतेस्थानी होते. सर्वपक्षीय नेतेमंडळी तसेच विविध संघटनांच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापनेसंदर्भात आपल्या तीव्र भावना व्यक्त केले.


विशेषतः परभणीतील लोकसंख्या, दारिद्र्यरेषेखालील लोकसंख्या,दरडोई उत्पन्न, मागासलेपण,आर्थिक अनुशेष, वगैरे गोष्टी ओळखून सरकारने येथील जिल्हा शासकीय रुग्णालयास शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा दर्जा द्यावा असा सूर व्यक्त केला. परभणीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन होणे सर्वार्थाने अनुकूल ठरणारे आहे. त्यामुळे सरकारने शासकीयच वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करावे अशी मागणी केली. जिल्हा शासकीय रुग्णालयात खाटांसह अन्य सुविधा उपलब्ध आहेत, विशेषतः शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापने करिता आवश्यक असणाऱ्या सर्व बाबी उपलब्ध आहेत, काही किरकोळ त्रुटी असतील त्या दूर करून परभणीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करावे असे नमूद केले.


खासदार संजय जाधव यांनी आपल्या भाषणातून कोरोंना विरुद्धच्या लढाईत शहरासह जिल्ह्याने अनेक अनुभव घेतले आहेत, त्यातील काही अनुभव कटू आहेत, आरोग्य यंत्रणा अंतर्गत त्रूटी,उणिवा दिसून आल्या आहेत,त्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परभणीत स्थापने होणे कसे गरजेचे आहे ते लक्ष्यात येईल. खाजगी किंवा पी. पी.वैद्यकीय महाविद्यालय देण्याऐवजी सरकारने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करावे, जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या इच्छा आकांक्षांचा लक्षात घ्याव्यात, अंत पाहू नये असे ते म्हणाले, या लढाई करता आपण पुढाकार घेतला आहे, सर्वपक्षीय नेते मंडळी ,जनता सोबत आहेत, सर्वांच्या सहकार्याने सर्वांच्याच मदतीने या मागणीसाठी ची लढाई निश्चित यशस्वी केली जाईल शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन होईपर्यंत लढा उभारला जाईल, यात तसूभर माघार घेतली जाणार नाही ही लढाई श्रेयवादाची नाही, हक्काची आहे, त्यासाठी आपण काहीही करू असा इशाराही खासदार जाधव यांनी आपल्या भाषणातून दिला.


यावेळी माजी आमदार सुरेशदादा देशमुख यांनी भाषणातून या संघर्षात आपण सर्व सोबत आहोत, या लढाईत स्वतंत्र भूमिका मांडणे ऐवजी एकत्रितपणे लढवण्याची तयारी ठेवली पाहिजे ,जे कोणी आज नाहीत, त्या सर्वांना एकत्र आणले पाहिजे व एकसंघ पणे यासाठी लढले पाहिजे असे म्हटले जे कोणी श्रेय लाटत असतील त्यांना श्रेय लाटू द्या,पण आधी महाविद्यालय पदरात पाडून घ्या असे ते म्हणाले. ज्येष्ठ नेते वरपूडकर यांनी सर्वांच्या सोबतीने, सर्वांच्या सहकार्याने, यासाठी निश्चितच प्रयत्न केले जातील,वरिष्ठ पातळीवर सर्वपक्षीय नेतेमंडळी गाठीभेटी घेतल्या आहेत, कोणी श्रेय लादण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, मराठवाडा विद्यापीठाच्या स्थापने करता दिलेल्या लढाई प्रमाणे वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्थापने करता मोठी लढाई द्यावी लागेल,त्यासाठी सगळ्यांनी तयार राहावे. परभणीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात स्थापन होणे गरजेचे आहे असेही ते म्हणाले.






Post a Comment

0 Comments