Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या पालकांच्या पाल्यांना जिंतूरच्या ज्ञानोपासक महाविद्यालयात मोफत प्रवेश




जिंतूर ➡️ कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या पालकांच्या पाल्यांसाठी कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर शैक्षणिक वर्ष 2021-2022 या वर्षाकरिता अकरावी ते पदवीपर्यंतच्या वर्गात जिंतूरच्या ज्ञानोपासक महाविद्यालयात मोफत प्रवेशाची सोय करण्यात आली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, माजीमंत्री ॲड गणेशरावजी दुधगावकर यांनी सुरू केलेले जिंतूर येथील ज्ञानोपासक महाविद्यालय हे नाविन्यपूर्ण उपक्रम व गुणवत्ता या बाबतीत नावाजलेले आहे. 


कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर शैक्षणिक वर्ष 2021-22 पासून कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या पालकांच्या पाल्यांसाठी इयत्ता 11 वी ते पदवी यापैकी कोणत्याही वर्गासाठी मोफत प्रवेश दिला जाणार आहे. दरम्यान, सदर प्रतिनिधीशी बोलताना महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. श्रीधर भोंबे म्हणाले की, कोरोनामुळे ज्या पालकांचे निधन झाले आहे अशा पालकांच्या पाल्याचे पालकत्व आमच्या ज्ञानोपासक महाविद्यालयाने स्वीकारले असून अशा पाल्यांना महाविद्यालयात मोफत प्रवेश दिला जात आहे. 


आमच्या महाविद्यालयाची दर्जेदार शिक्षणाची परंपरा असून महाविद्यालयात संस्कार, शिस्त, राष्ट्रीय एकात्मता आणि सामाजिक बांधिलकी जोपासली जाते. तसेच महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना, विविध क्रीडा स्पर्धा, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, रोजगार मेळावा आदी उपक्रमही राबवले जातात. तरी ज्या पालकांचे कोरोनामुळे निधन झाले आहे अशा पालकांच्या पाल्यांनी आपल्या प्रवेशासाठी आमच्या महाविद्यालयाशी तातडीने संपर्क साधून आपला प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन डॉ. भोंबे यांनी केले आहे.





Post a Comment

0 Comments